Rishabh Pant Health Update : उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाला आहे. या अपघातात (Rishabh Pant Accident) तो गंभीर जखमी झाला असून सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान बीसीसीआयने आता ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली असून बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. बोर्डाने एक मीडिया स्टेटमेंट देखील ट्वीट केले आहे. बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी उत्तराखंडमधील रुरकीजवळ कार अपघात झाला. त्याला सक्शम हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी अँड ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर दुखापत झाल्यानंतर लगेच उपचार करण्यात आले. या अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं असून आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे."
बोर्डाने पुढे लिहिले आहे की,"बीसीसीआय ऋषभच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे, तर वैद्यकीय पथक ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी याची काळजी बोर्ड घेईल. या वेदनादायक वेळेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू."
बीसीसीआयचं ट्वीट-
कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात
भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं.
हे देखील वाचा-