Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) आज तिचा 27वा वाढदिवस साजरा करतेय. तिच्या वाढदिवसानिमित्त युजवेंद्र चहलनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यानं नेहमी चांगल्या-वाईट काळात साथ दिल्याबद्दल धनश्रीची आभार मानले आहेत. लवकरच आपण पार्टी करणार असल्याचंही युजवेंद्र चहलनं तिला म्हटलंय. सध्या युजवेंद्र चहल भारतीय संघासह आहे, ज्यांना उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. 


धनश्री वर्माच्या वाढदिवसानिमित्त युजवेंद्र चहलनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचे एकसोबतचे काही फोटो जोडले गेले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युजवेंद्र चहलनं लिहिलंय की, "माझ्या चांगल्या-वाईट काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद. यासह मी माझ्या सर्वात चांगली आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या पत्नीला तुझ्या रुपात मिळवून धन्य झालोय. आज, उद्या आणि येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो. लव्ह यू"


युजवेंद्र चहली इन्स्टाग्राम पोस्ट- 






 


धनश्री वर्माच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया
नुकतीच धनश्रीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केलीय. डान्स प्रॅक्टिसदरम्यान तिला दुखापत झाली होती. धनश्री वर्मा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असून आपल्या चाहत्यांच मनोरंजन करण्यासाठी सतत नवीन व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या चाहत्यांचाही वर्ग मोठा आहे. तिचे 5.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.


2020 मध्ये अडकली लग्नबेडीत
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी प्रेमात पडल्यानंतरच्या तीन महिन्यातच लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर नातेवाईक-जवळचे मित्र मैत्रिणी आणि आप्तेष्ठांच्या उपस्थितीत 22 डिसेंबर 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. धनश्री वर्मा पेशानं डेंटिस्ट आहेत. मुंबईतील एका कॉलेजमधून तिनं वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेतलं. अभिनेता हृतिक रोशनशी झालेल्या भेटीनंतर तिचं मन नृत्याकडं आकर्षित झालं. यानंतर तिनं डान्स विश्वातच करिअर करायचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड होती. 


हे देखील वाचा-