Sanju Samson :  भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) बऱ्याच काळापासून टीम इंडियामध्ये नाही, त्यामुळे त्याचे फॅन्स कमालीचे नाराज आहेत. संजूने आयपीएलमध्ये राजस्थान संघाचे नेतृत्त्व करतानाही चांगली कामगिरी केली आहे. पण संघात त्याला जागा अद्याप मिळालेली नाही. अशामध्ये आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी (India vs South Africa) सज्ज झाला आहे. पहिला सामना केरळच्या तिरुवनंतपुरम येथे खेळवला जाणार असून संजूही केरळचा असल्याने भारतीय संघ केरळमध्ये पोहोचताच नाराज चाहत्यांनी संजू, संजू असं म्हणत घोषणाबाजी केली. संबधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संजूचे फॅन्स हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. 


पाहा व्हिडीओ-






सूर्याने आठवलं संजूला 


एकीकडे नाराज फॅन्स संजूच्या नावाचे नारे देत असताना. सूर्यकुमार यादवच्या एका कृतीमुळे केरळ फॅन्स काहीसे सुखावले आहेत. टीम इंडियाची बस एअरपोर्टवरुन हॉटेलच्या दिशेने निघाली असता केरळचे फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना पाहण्यासाठी उभे होते, त्यावेळी सूर्याने आपल्या फोनमध्ये संजूचा फोटो फॅन्सना दाखवत थम रिएक्ट केलं. त्याच्या या कृतीने फॅन्सही बरेच आनंदी झाल्याचं दिसून आलं. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू असल्याने त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


पाहा व्हिडीओ -






संजूकडे 'अ' संघाचं नेतृत्त्व


भारतीय 'अ' संघ न्यूझीलंडच्या 'अ' संघाशी सामने खेळत आहे. यासाठी संजू सॅमसनकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर हे दिग्गजही संघात असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या 'अ' संघामध्ये 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन सामन्यांची  एकदिवसीय मालिका खेळवली जात असून पहिले दोन्ही सामने भारतने जिंकल्याचं दिसून आलं. 


हे देखील वाचा-