एक्स्प्लोर

Womens World Cup 2025 Semifinal Qualification : सेमीफायनलमध्ये एका टीमची जागा पक्की, उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ, टीम इंडियासाठी गणित झालं गुंतागुंतीचं, जाणून घ्या समीकरण

Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे.

Women’s World Cup 2025 Semifinal Scenario Team India : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत पहिली सेमीफायनलिस्ट टीम निश्चित झाली आहे. सात वेळा विजेतेपद मिळवलेल्या ऑस्ट्रेलिया (Australia Qualify Womens World Cup 2025 Semifinal) संघाने सलग पाच सामने जिंकत सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. पॉइंट्स टेबलवर त्यांच्या नावासमोर आता “Q" म्हणजेच पात्र लिहिले गेले आहे. मात्र, यामुळे उरलेल्या 3 जागांसाठी चढाओढ सुरू झाली आहे, ज्यामध्ये टीम इंडियासाठी गणित गुंतागुंतीचं झालं आहे. 

ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये, तर....

पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे आणि त्यांचा सेमीफायनल प्रवास निश्चित झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून, त्यांना उरलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एक विजय मिळवला तरी सेमीफायनलची तिकिटं मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिका, ज्यांनी चार पैकी तीन सामने जिंकले असून त्यांचे सहा गुण झाले आहेत. भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

टीम इंडियासाठी समीकरण झालं गुंतागुंतीचं

भारतीय संघाने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आणि दोन हरले आहेत. आता टीम इंडियासमोर इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे तीन सामने उरले आहेत. 19 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्धचा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात पराभव झाल्यास भारताची सेमीफायनलची आशा धोक्यात येऊ शकते.

दक्षिण आफ्रिका अन् इंग्लंडची जागा जवळपास पक्की

दक्षिण आफ्रिकेला अजून श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी खेळायचे आहे. या तिन्हीपैकी फक्त एक सामना जिंकला तरी ते अंतिम चारमध्ये पोहोचतील. इंग्लंडलाही फक्त एका विजयाची गरज आहे, त्यांचे उरलेले सामने भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे.

भारतासाठी आता ‘करो या मरो’ परिस्थिति, न्यूझीलंडचा धोका का?

भारताला उरलेले तीनपैकी दोन सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, विशेषतः इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध. न्यूझीलंडच भारतासाठी सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. न्यूझीलंडने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. एक जिंकला, दोन हरले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांचे 3 गुण आहेत. आता त्यांचे उरलेले सामने पाकिस्तान, भारत आणि इंग्लंडविरुद्ध आहेत. जर न्यूझीलंडने उरलेले तिन्ही सामने जिंकले, किंवा भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड दोघांविरुद्ध पराभव पत्करला, तर भारताला सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडावे लागू शकते. म्हणून भारताला केवळ स्वतःचे सामने जिंकणेच नाही, तर न्यूझीलंड हरावा अशी प्रार्थना देखील करावी लागणार आहे.

हे ही वाचा -

Bangladesh Players Vehicles Attacked After ODI Series : बांगलादेशी खेळाडूंच्या गाड्यांवर हल्ला, लाजिरवाण्या पराभवानंतर एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? क्रिकेटरने सांगितला थरारक प्रसंग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार

व्हिडीओ

Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report
BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
विजयानंतर तलवार मिरवणं भोवलं ; पराभूत उमेदवाराच्या घरासमोर 2 तास गोंधळ घालणाऱ्या अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल
BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार
KDMC Election Results 2026: कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
कल्याण-डोंबिवलीत शिंदे सेनेकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात? ठाकरेंच्या एकमेव नगरसेवकाला गळाला लावणार? श्रीकांत शिंदेंच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलेले नाही तर भाजपला...; पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलेले नाही तर भाजपला...; पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
BJP Leader Raj K purohit passes away: मोठी बातमी: भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन
भाजपचे मुंबईतील ज्येष्ठ नेते राज के पुरोहित यांचे निधन
Amravati Municipal Corporation Election 2026 : भाजपचं रवी राणांच्या युवा स्वाभिमानशी जुळलं, मॅजिक फिगरसाठी अडलं; काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी, अमरावतीत महापौर कोणाचा?
भाजपचं रवी राणांच्या युवा स्वाभिमानशी जुळलं, मॅजिक फिगरसाठी अडलं; काँग्रेसकडूनही जोरदार मोर्चेबांधणी, अमरावतीत महापौर कोणाचा?
Embed widget