India vs South Africa Test Series: सचिन तेंडुलकर, कपिल देव अन् सौरव गांगुली; जे कोणीच करू शकलं नाही, ते रोहित करणार?
भारतीय संघाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्यापासून (26 डिसेंबर) सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे.
India vs South Africa Test Series: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर असून, आतापर्यंत त्यांनी येथे चमकदार कामगिरी केली आहे. सर्वात आधी, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. यानंतर केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) 2-1 नं जिंकून इतिहास रचला.
आता भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्यापासून (26 डिसेंबर) सेंच्युरियन येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.
आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब
त्याआधी भारतीय चाहत्यांसाठी काही धक्कादायक आकडे समोर येत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु, त्यांनी आजपर्यंत एकही मालिका जिंकलेली नाही. या काळात सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्यासारखे महान खेळाडू आणि कर्णधार झाले आहेत. पण आफ्रिकेत मालिका जिंकून कोणालाही इतिहास रचता आला नाही.
It is time for the Test series and Captain Rohit Sharma is READY! 💪🏾🙌🏽#TeamIndia | @ImRo45 | #SAvIND pic.twitter.com/EYwvGjuKGw
— BCCI (@BCCI) December 24, 2023
मात्र, यावेळी रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय क्रिकेट संघानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण 8 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या आहेत. यापैकी 7 मालिकांमध्ये पराभव झाले आहेत, तर 1 मालिका अनिर्णित राहिली. दरम्यान, एकूण 15 द्विपक्षीय कसोटी मालिका दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेल्या. यापैकी टीम इंडियानं फक्त 4 मालिका जिंकल्या आहेत, तर 8 मालिका गमावले आहेत. तसेच, 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघांमधील कसोटी मालिकांमधील रेकॉर्ड
एकूण कसोटी मालिका : 8
दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला: 7
टीम इंडिया जिंकली : 0
ड्रॉ : 1
ओवरऑल टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकांमधील रेकॉर्ड
एकूण कसोटी मालिका : 15
दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला : 8
टीम इंडिया जिंकली : 4
ड्रॉ : 3
कसोटी सामन्यांमध्ये आफ्रिकेमध्ये टीम इंडियाचा फारसा दबदबा नाही
जर दोन्ही संघांमधील कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर यामध्येही भारतीय क्रिकेट संघाचा फारसा दबदबा दिसून आलेला नाही. टीम इंडियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 4 सामने जिंकेल आहेत, तर 12 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर 7 सामन्यांमध्ये ड्रॉ झाला आहे. दरम्यान, एकूण, दोन्ही संघांमध्ये एकूण 42 कसोटी सामने झाले, ज्यापैकी टीम इंडियानं 15 जिंकले आणि 17 गमावले. 10 सामने अनिर्णित राहिले होते.
#TeamIndia members are here at the SuperSport Park, as they gear up for the 1st Test against South Africa.#SAvIND pic.twitter.com/NEKEpSqL7s
— BCCI (@BCCI) December 24, 2023
दक्षिण आफ्रिकेमध्ये दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड
एकूण कसोटी सामने : 23
दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला : 4
टीम इंडिया जिंकली : 12
ड्रॉ : 7
ओव्हरऑल टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड
एकूण कसोटी सामने : 42
दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला : 15
टीम इंडिया जिंकली : 17
ड्रॉ : 10
कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांचा स्क्वॉड
टीम इंडिया टेस्ट स्क्वॉड : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा आणि केएस भरत (विकेटकीपर).
दक्षिण आफ्रिकेची टेस्ट स्क्वॉड : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, टोनी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को जानसेन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेने.