India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात सुरु सामन्यात भारतानं 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं आहे. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे. विशेष म्हणजे हा सामना जिंकून भारत मालिकाही 2-0 ने विजयी आघाडी घेत खिशात घालू शकतो. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज अप्रतिम कामगिरी केली. यावेळी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे आज गोलंदाजी केलेल्या भारताच्या सर्व गोलंदाजांना विकेट मिळवता आल्या आहेत.


सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तसंच फलंदाजी निवडत विजय मिळवला होता. याशिवाय मागील काही एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अगदी विशाल धावसंख्या उभारली होती. आजही नाणेफेक जिंकून भारत फलंदाजी घेईल असं वाटत होतं. पण भारतानं असं न करत गोलंदाजी निवडली. पण गोलंदाजांनी हा निर्णय अगदी पहिल्या ओव्हरपासून योग्य असल्याचं दाखवलं. शमीने पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. विशेष म्हणजे भारताकडून आज गोलंदाजी केलेल्या सहाही गोलंदाजांच्या खात्यात किमान एकतरी विकेट आली. यावेळी सर्वाधिक विकेट्स शमीने तीन घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरल्यामुळे न्यूझीलंडता संघ 100 धावांचा आकडा गाठू शकला.






कसे आहेत दोन्ही संघ?


भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी


न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर


हे देखील वाचा-