India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. आजपासून सुरुवात होत आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातीलच संघ घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पण आज भारताने प्रथम गोलंदाजी निवडत काहीसा वेगळा निर्णय़ घेतला आहे. कारण मागील काही एकदिवसीय सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अगदी विशाल धावसंख्या उभारली होती. आजही नाणेफेक जिंकल्यामुळे भारताकडे फलंदाजी घेण्याची संधी होती. पण भारताने गोलंदाजी निवडली आहे. रायपूरच्या मैदानात आज पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जात असून एक रोमहर्षक लढत पाहायला मिळू शकते.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
मालिकाविजयाची सुवर्णसंधी
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊन मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आजवरच्या इतिहासाचा विचार केल्यास भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 114 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 56 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. याशिवाय 7 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला.
हे देखील वाचा-