नवी दिल्ली : भारतानं (Team India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 7  धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup 2024) जिंकला. भारतानं 29 जून रोजी बारबाडोसमध्ये विजेतेपद मिळवत आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ 11 वर्षांनी संपवला. भारतानं 2013  मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी 20 वर्ल्डकपचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं. वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचं देशात जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत विजयी परेड देखील आयोजित करण्यात आली होती. आता भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजयाला एक महिना होत असताना बीसीसीआयनं खास ट्विट करत आठवणी जागवल्या आहेत. 


बीसीसीआयनं आठवणी जागवल्या


बीसीसीआयनं टी 20 वर्ल्ड कपमधील उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पोस्टरवर स्थान दिलं आहे.  भारतानं उपांत्य फेरीत रोहित शर्मा, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादवच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केलं होतं. कुलदीप यादवनं चार ओव्हरमध्ये 19  धावा देत तीन विकेट घेतल्या होत्या.


भारतानं 17 वर्षानंतर टी 20  वर्ल्ड कप जिकंला


रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवलं. विराट कोहली आणि अक्षर पटेलच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतानं 176  धावा केल्या होत्या. यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिकेला 8 विकेटवर 169 धावांवर रोखत विश्वविजेतेपद मिळवलं.  बीसीसीआयनं या विश्वविजयाच्या आठवणी खास पोस्ट करुन जागवल्या आहेत. यामध्ये फायनलमध्ये दमदार कामगिरी करत प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या विराट कोहलीला स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या बाजूनं मॅच फिरवण्यामध्ये महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरलेला सूर्यकुमार यादवनं डेव्हिड मिलरचा कॅच गेमचेंजर होता. सूर्यकुमार यादवला देखील पोस्टरवर स्थान देण्यात आलं आहे. 


रोहित शर्मा भारतानं  2007  मध्ये टी 20  वर्ल्ड कप जिंकला होता त्या संघाचा देखील सदस्य होता. 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादवसह प्लेअर ऑफ द टुर्नामेंट असलेल्या जसप्रीत बुमराह आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावांचा यशस्वीपणे बचाव करणाऱ्या हार्दिक पांड्याला देखील पोस्टरवर स्थान देत बीसीसीआयनं विश्वविजयाच्या आठवणी जागवल्या आहेत.   






संबंधित बातम्या : 



Virat Kohli : भारतीय संघात विराट कोहलीची जागा कोण घेणार? रॉबिन उथाप्पानं दोन नावं सांगितली