Team India T20 World Cup victory parade Live Updates : या संघाचा मला अभिमान, ही ट्रॉफी संपूर्ण देशाची - रोहित शर्मा

Indian Cricket Team Live Update: टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतला.

मुकेश चव्हाण Last Updated: 04 Jul 2024 09:50 PM
विश्वविजेत्यासाठी मुंबई थांबली, रस्त्यावर गर्दी

टीम इंडियाकडून चाहत्यांचे आभार

वानखेडे स्टेडियमवर चॅम्पियन टीम इंडियाने चाहत्यांचे आभार व्यक्त केले. संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले.  





जय शाह यांच्याकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस प्रदान करण्यात आले

BCCI ने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांच्या गजरात टीम इंडियाने चाहत्यांचे आभार मानले.





तो क्षण कधीच विसरणार नाही - विराट कोहली

विश्वचषक विजयानंतर जेव्हा पायऱ्या चढत होतो तेव्हा मी रडत होतो. रोहित रडत होता, तो क्षण आपण कधीच विसरणार नाही,  असे विराट कोहली म्हणाला.

बुमराह भारताकडून खेळतो, हे आपलं नशीब - विराट

जसप्रीत बुमराह भारताकडून खेळतोय याचा मला खूप आनंद आहे -विराट कोहली

खूप दिवसांपासून यासाठी प्रयत्न करत होतो - विराट कोहली

रोहित आणि मी, आम्ही खूप दिवसांपासून यासाठी प्रयत्न करत होतो. आम्हाला नेहमीच विश्वचषक जिंकायचा होता. वानखेडेवर ट्रॉफी परत आणणे ही खूप खास भावना आहे, असे विराट कोहली म्हणाला.

आजचा नजारा कधीच विसरणार नाही - विराट कोहली

वानखेड़े स्टेडियममध्ये स्वागत समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही टाळ्या वाजवून घेतल्या. आज जे पाहिले ते विसरता येणार नाही, असे तो म्हणाला. विश्वचषकाइतकाच आजचा क्षण माझ्यासाठी खास होता.

विराट कोहलीकडून बुमराहचे कौतुक

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरचं पाच षटकं महत्वाची ठरली. जसप्रीत बुमराह हा या पिढीतील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यानं आपल्याला सामन्यात पुन्हा पुन्हा आणले.  त्याची गोलंदाजी सर्वोत्तम झाली. - विराट कोहली





चिकू चिकूच्या वानखेडेवर जयघोष

रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे. सामना पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे, मला माझ्या या संघाचा अभिमान आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे कौतुक केले. हार्दिक पांड्याने वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकली होती. रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी केली.

खेळाडू आणि चाहत्यांकडून रोहित शर्मासाठी स्टॅडिंग ओव्हेशन

संघातील पोरं माझ्यासाठी कुटुंबासारखी - राहुल द्रविड

हा संघातील पोरं म्हणजे माझ्यासाठी कुटुंबासारखी आहेत. कोणामध्येही अटिट्युड नाही. सर्वांनी मेहनत घेतली, असे राहुल द्रविड म्हणाला.

वानखेडेवर हार्दिक हार्दिकचा जयघोष

रोहित शर्माने चाहत्यांचे अभिवादन केले

मुंबईकर चाहत्यांचं रोहित शर्माने हातवारे करत अभिवादन केले. आम्हाला विश्वचषक जिंकण्याची जितकी इच्छा होती, त्यापेक्षा जास्त चाहते उत्साही होते. हा संघ खास आहे, या संघाचं नेतृत्व कऱण्याची संधी मिळली, मी खूप लकी आहे, असे रोहित शर्मा म्हणाला.

मला संघाचा अभिमान - रोहित शर्मा

मला या संघाचा अभिमान आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. प्रत्येकानं आपलं 100 टक्के योगदान दिले, असे रोहित शर्मा म्हणाला.

रोहित शर्माकडून खेळाडूंचं कौतुक

रोहित शर्माने वानखेडेवर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केले. हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक होते, सूर्यकुमार यादवनेही भन्नाट झेल घेतला, असे रोहित शर्मा म्हणाला. सूर्यकुमार यादव यानं असे झेल घेण्यासाठी अनेकवर्षे सराव केलाय. 

सूर्यादादाचा स्वॅग एक नंबर

विराट-रोहितचा जल्लोष, वानखेडेवर थिरकले

कार्यक्रमाला सुरुवात

झोमॅटोचा स्वॅग....

Wankhede stadium : वानखेडेमध्ये रोहित शर्माचा अनोखा अंदाज

2022 अर्जेंटिना अन् 2024 मुंबई... चाहत्यांचा जनसागर उसळला

विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूचा डान्स

विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूचा डान्स, वानखेडेमध्ये मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.





हार्दिक पांड्याचा वानखेडेवर अनोखा अंदाज

विराट कोहलीकडून फ्लाईंग किस, किंगच्या अनोख्या अंदाजामुळे चाहते भारावले

रोहित-कोहलीचा जलवा, चषकासोबतचा व्हिडीओ व्हायरल

टीम इंडिया जल्लोष

17 वर्षानंतर टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर आज टीम इंडिया मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झाली. चार तासांपासून टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखो तरुण-तरुणाई एकवटले. लाखोंचा जनसागर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळाला. टीम इंडिया मरीन ड्राईव्ह वरून वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.

Team India Victory Parade LIVE: वानखेडेबाहेर पोलिसांकडून लाठीचार्ज 

Team India Victory Parade : वानखेडे स्टेडियमबाहेर हजारो चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. दुपारी चार वाजताच स्टेडियमधील बसण्याची मर्यादा संपली होती, त्यामुळे गेट बंद कऱण्यात आले आहेत. तरीही चाहत्यांकडून अति प्रमाणात गर्दी करण्यात आली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलाय. 

Team India Victory Parade LIVE: भारतीय संघाने वानखडे स्टेडियम मध्ये प्रवेश केला आहे

Team India Victory Parade LIVE:  भारतीय संघाने वानखडे स्टेडियम मध्ये प्रवेश केला. चाहत्यांकडून जल्लोषात अभिवादन.. रोहित, विराट, हार्दिक, बुमराहच्या नावांनी घोषणाबाजी

Team India Victory Parade LIVE: देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचे स्वागत

Team India Victory Parade LIVE: टीम इंडियाचं मुंबईत मनापासून स्वागत आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वात इंडियाने रेकॉर्ड केलाय. 17 वर्षानंतर भारताने चषक जिंकला. मुंबईकर मोठ्या उत्साहाने टीमचे स्वागत करत आहेत. नागरिकांना विनंती आहे की गर्दी मोठी आहे, उत्साह देखील आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी. प्रशासन आणि पोलिसांनी व्यवस्था केली आहे

चहल-कुलदीपचा वेगळा स्वॅग

Team India Victory Parade LIVE:  मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यासह सर्व खेळाडू ओपन डेक बसमध्ये आहेत.  बसमध्ये बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि राजीव शुक्ला देखील उपस्थित होते. चहल आणि कुलदीप तिरंगा परिधान करताना दिसले.





टीम इंडियाचे ग्रँड वेलकम

विराट कोहली चषकासह

टीम इंडियाची विजयी मिरवणूक सुरु, चाहत्यांचा जल्लोष शिगेला

लाखोंचा जनसागर रस्त्यावर

Team India Victory Parade LIVE: विजयोत्सवाला सुरुवात 

टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. भारतीय खेळाडू ओपन डेक बसवर बसले आहेत. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे मैदानापर्यंत ही रॅली निघणार आहे. 

रोहित शर्मानं चषक केला स्वच्छ

वानखेडेवर जाण्याआधी हार्दिक पांड्याचं खास ट्वीट

प्रचंड संख्यने जमलेल्या उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टि-२० विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.

Team India : विमानतळावर टीम इंडियाच भव्य स्वागत

Team India :  मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं भव्य स्वागत झाले आहे. मुंबईमध्ये लाखो चाहते रस्त्यावर उथरले आहे. पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थाही कडेकोट केली आहे.



Team India : मुंबई पोलिसांची मुंबईकरांना विनंती

Team India : भारतीय क्रिकेट संघाच्या विजय यात्रेसाठी वानखेडे स्टेडियम व आजूबाजूला परिसरात चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणे टाळावे, मुंबई पोलिसांची चाहत्यांना विनंती

Team India : चाहत्यांचा रस्त्यावर महासागर

Team India : पश्चिम द्रुतगती महामार्गावर टीम इंडिया यांचा स्वागत करण्यासाठी  मोठा संख्या मध्ये मुंबईकर रस्त्याच्या कडेला उभे आहेत. विशेष बसमधून टीम इंडिया मरीन ड्राईव्हकडे रवाना झाली आहे.

Team India : लोकशाहीच्या विजयानंतर आज दुसरा विजय - रावसाहेब दानवे

Team India :  टी 20 वर्ल्ड कपचा शेवटचा सामना देशातील प्रत्येक नागरिकांनी पाहिला.. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो सामना पाहिला... जेव्हा भारत जिंकला तेव्हा फार मोठा जल्लोष या देशात पाहायला मिळाला.. अनेक वर्षानंतर भारताचे स्वप्न पूर्ण झालं आणि आपण विश्वकप जिंकला. आज टीम इंडिया भारतात दाखल झाली.. आज अत्यंत चांगला उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज मुंबईत क्रिकेटप्रेमी नाही तर नागरिकांनी टीमचे जल्लोषात स्वागत केले. लोकशाहीच्या विजयानंतर आज दुसरा विजय मानतो, असे रावसाहेब दानवे म्हणाले. 

Team India : मरीन ड्राईव्हवर चाहत्यांचा महासागर

Team India : मरीन ड्राईव्हवर येऊ नका- मुंबई पोलीस

Team India :  मरीन ड्राईव्हवर येऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून चाहत्यांना कऱण्यात येत आहे. मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर लोकांची गर्दी झाली आहे.



Mumbai Airport : टीम इंडियाला एअरपोर्टवर वॉटर सॅल्युट

Mumbai Airport :  टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झालं.  विमानतळ प्राधिकरणकडून टीम इंडियाला वॉटर सलामी देण्यात आली. अवघ्या काही मिनिटांमध्ये टीम इंडियाच्या खेळाडू मुंबई विमानतळामधून गेटच्या बाहेर येणार आहेत. बस मध्ये बसून मुंबई विमानतळामधून मरीन ड्राईव्हसाठी निघणार आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्तानात करण्यात आला आहे. व्हीआयपी कॉनवे मधून टीम इंडियाची बस पश्चिम द्रुतगती महामार्ग वरून पास होणार आहे.





Team India : चाहत्यांचा महासागर मुंबईच्या रस्त्यावर

Team India : टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांचा महासागर मुंबईच्या रस्त्यावर उतरला आहे.  पावसातही टीम इंडियासाठी गर्दी जमली आहे. 

Team India : टीम इंडिया मुंबईत दाखल, चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत

Team India : टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर आगमन झाले आहे. रोहित शर्मा आणि संघाचं विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलेय. 

Team India : टीम इंडिया थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार

Mumbai : काही वेळात टीम इंडिया मुंबई एअरपोर्टवर दाखल होणार आहे. स्वागत करण्यासाठी मुंबई एअरपोर्ट परीसरात मोठी गर्दी झाली आहे. क्रिकेट फॅन्सचा उत्साह शिगेला आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा.... अशी चाहत्यांकडून घोषणाबाजी सुरु आहे.  

Sachin Sawant : हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे काय? - सचिन सावंत

Sachin Sawant : 2007 च्या वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचे स्वागत करणारी बस आपल्या मुंबईची होती. आपल्या बेस्ट ची होती. आज वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघासाठी मुंबईकरांच्या नाकावर टिच्चून गुजरात वरुन बस मागविण्यात आली आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नव्हे काय? देशाच्या आर्थिक राजधानीत त्या दर्जाची बस बनत नाही? मुंबईत पण गुजरातचा प्रचार का? भाजपाचे नेते आशिष शेलार आता मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आहेत. त्यामुळेच हे घडत आहे. मुख्यमंत्री गप्प का? आम्ही या भयंकर अपमानाचा जाहीर निषेध करत आहोत. आमच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे सचिन सावंत यांनी ट्वीट केले आहे.

वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी, धो धो पावसात रोहित रोहितच्या घोषणा

वानखेडे स्टेडियम फुल्ल, रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी

पावसाला सुरुवात

मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धोधो पावसातही टीम इंडियाच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत. वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले आहे. थोड्याच वेळात टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे.

मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमले

टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचे मुंबईत आगमन होतेय...रोहित शर्माच्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत.

Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी ढोला पथक सज्ज

Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे.

Team India Celebration: वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी

Team India Celebration: वानखेडे स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दल स्थानिक पोलीस असा बंदोबस्त करण्यात आला. 

Team India Celebration: नरेंद्र मोदींना 1 नंबरची जर्सी भेट-

Team India Celebration: बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्ना आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाची जर्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. या जर्सीचा क्रमांक 1 होता आणि त्यावर नमो असे लिहिले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Team India Celebration: टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींसोबत मारल्या गप्पा

Team India Celebration: टीम इंडिया आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक ट्रॉफी आणि सर्व खेळाडूंसह फोटो काढला. तसेच विश्वचषकातील काही आठवणी नरेंद्र मोदी सांगताना टीम इंडियाचे खेळाडू व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.





Team India Celebration: मुंबईला रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल

Team India Celebration: मुंबईसाठी रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले.

Team India Celebration: नरेंद्र मोदींची भेट घेऊन टीम इंडिया माघारी

Team India Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टीम इंडिया माघारी परतली आहे. आता थोड्याच वेळात सर्व खेळाडू मुंबईसाठी रवाना झाली आहे.

Indian Cricket Team Updates: विश्वविजेत्यांच्या शोभायात्रेसाठी पोलीसही सज्ज; मुंबईतील वाहतूक मार्गात

Indian Team Live Update:  विश्वविजेत्यांच्या शोभायात्रेसाठी पोलीसही सज्ज, वाहतूक मार्गातही करण्यात आला आहे.


भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे त्यांची शोभायात्रा ४ जुलैला आयोजीत करण्यात येणार आहे.


त्यामुळे मुंबई पोलीसही सज्ज झाले असून वानखेडे स्टेडियमसह शोभायात्रेच्या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.


याशिवाय शोभायात्रेच्या पार्श्वभूमिवर एन.एस मार्गाची उत्तर व दक्षिण वाहिनी एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.


वीर नरीमन रोड चर्चगेटपासून किलाचंद चौकपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.


याशिवाय दिनशॉ वाच्छा मार्ग डब्ल्यू आय.ए चौकपासून रतनलाल बुबनाचौकापर्यंत वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे.


तसेच हुतात्मा चौकापासून वेणूताई चव्हाण चौकापर्यंत मादाम कामा रोड बंद ठेवण्यात येणार आहे.


बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग व विनय शहा मार्गही वाहतुकींसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.


नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहेत.


कोस्टल मार्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. वरील सर्व मार्गांवर वाहने उभी करण्यास रुग्णावाहिका, पोलिसांची वाहने, अग्निशमन दला व अतिमहत्त्वााच्या व्यक्तीची वाहने वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.


 सायंकाळी पाच नंतर आयोजीत शोभायात्रेसाठी पोलीस वानखेडे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे.


 या शोभयात्रे निमित्त पाच हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या चाहत्यांनी रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


तसेच शोभयात्रेत सहभागी होण्यासाठी ४:३० वा पूर्वी मरीनड्राईवह येथे सहभागी व्हावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे


वानखडे स्टेडिअमच्या आतही विजयीशोभयात्रा होणार आहे. त्यासाठी येणार्यांनी ६ वा आत वानखडे स्टेडिअम मध्ये प्रवेश करावा

Indian Team Live Update: टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात

Indian Team Live Update: सध्या मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

Indian Team Live Update: हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली

Indian Team Live Update: हार्दिक पांड्या हा विराट कोहलीच्या पाठोपाठ विमानतळाबाहेर पडला. त्यावेळी चाहत्यांनी हार्दिकच्या नावाचा जयघोष केला. त्यावर हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. त्यानंतर हार्दिकने क्रीडाप्रेमींच्या दिशेने पाहत हात उंचावून अभिवादन केले. 

Indian Team Live Update: टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली टीव्ही-मोबाईलवर पाहता येणार

Indian Team Live Update: टीम इंडियाची मुंबईतील विजयी रॅली मोबाईलवर पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्सवर सायंकाळी 4 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स 1, हिंदी 1, 3 आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे जे चाहते मुंबईत पोहचू शकणार नाही, त्यांना आता टीव्ही आणि मोबाईलद्वारे या विजयी रॅलीचा आनंद घेता येणार आहे.

Indian Team Live Update: टीम इंडिया पंतप्रधान निवासस्थानी दाखल

Indian Team Live Update: टीम इंडिया पंतप्रधान यांचं निवास्थान असलेल्या 7 लोक कल्याण मार्ग येथे दाखल झाली आहे. थोड्याच वेळात टीम इंडियातील सर्व खेळाडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे.

Indian Team Live Update: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवचा गणपती डान्स-

Indian Team Live Update: टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यावेळी सूर्यकुमार मुंबईकर असल्याने त्याने मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 

Indian Team Live Update: रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला

Indian Team Live Update: दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला. दिल्ली विमानतळावरुन टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावून दाखवला. याशिवाय, चाहत्यांच्या गराड्यातून दिल्ली विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. 

Indian Team Live Update: भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल

Indian Team Live Update: विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाच्या वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो. आता टीम इंडिया 10 ते 12 या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत टीम इंडियाची बैठक पीएम ऑफिसमध्ये होऊ शकते, जी आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार होती.

Indian Team Live Update: टीम इंडिया हॉटेलमध्ये पोहोचली

Indian Team Live Update: टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित आणि कंपनीचे स्वागत केले.

Indian Team Live Update: टीम इंडिया हॉटेलला रवाना-

Indian Team Live Update: चॅम्पियन टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलकडे रवाना झाली आहे. भारतीय संघ विमानतळापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या ITC मौर्या हॉटेलमध्ये पोहोचेल.

Indian Team Live Update: विराट कोहलीसह सर्व खेळाडू बसमध्ये दाखल

Indian Team Live Update: विराट कोहली, राहुल द्रविडसह सर्व खेळाडू विमानतळावर उपस्थित असणाऱ्या बसमध्ये दाखल झाले आहेत. 

Indian Team live Update: पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Indian Team live Update: भारतात पोहोचल्यानंतर टीम इंडियाच्या वेळापत्रकातील पहिली गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. 

Indian Team live Update: आजचे टीम इंडियाचे वेळापत्रक- 

Indian Team live Update: सकाळी ६ वाजता: नवी दिल्लीत आगमन
सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट.
दुपारी २ वाजता : मुंबईकडे रवाना.
सायंकाळी ५ वाजता : मरिन ड्राइव्हला आगमन,
सायंकाळी ५ वाजता : वानखेडे स्टेडियमच्या दिशेने बस परेड. सायंकाळी ७ वाजल्यापासून: वानखेडे स्टेडियमवर विजयी सोहळा

Indian Team live Update: विमानतळावर जोरदार स्वागत

Indian Team live Update: दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहते आधीच विमानतळावर उपस्थित होते.

Indian Team live Update: टीम इंडिया चार्टर्ड फ्लाइटने भारतात पोहोचली

Indian Team live Update: टीम इंडिया बार्बाडोसहून दिल्लीत दाखल झाली आहे. एअर इंडियाच्या AIC24WC चार्टर्ड फ्लाइटने चॅम्पियन टीम इंडियाला मायदेशी आणले.

Indian Team live Update: टीम इंडिया बार्बाडोसहून भारतात दाखल

Indian Team live Update: T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया बार्बाडोसहून भारतात पोहोचली आहे. 16 तासांच्या प्रदीर्घ उड्डाणानंतर भारतीय संघ मायदेशी पोहोचला आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतीय संघाला मायदेशी आणण्यात आले.

पार्श्वभूमी

Indian Cricket Team Live Update:  टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची मुंबईमध्ये विजयी मिरवणूक निघणार आहे. सकाळी दिल्लीमध्ये टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी मुंबईत ओपन बसमधून विजयी मिरवणूक निघेल. त्यासाठी दुपारपासूनच चाहत्यांनी नरीम पॉईंटवर गर्दी केली. वानखेडे स्टेडियमही फूल्ल झालेय. चाहत्यांची गर्दी वाढत असतानाच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. धो धो पावसातही चाहत्यांचा उत्साह कायम होता. रस्त्यावर चाहते दुतर्फा थांबले होते. वानखेडेमध्ये छत्र्या उघडून चाहते बसले होते. जोरदार वाऱ्यासह जसा पाऊसही टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सहभागी झाला होता. चाहत्यांनीही या पावसात टीम इंडियाला उत्साहात सपोर्ट कऱण्यासाठी उभे राहिले होते. मरीन ड्राईव्ह चाहत्यांच्या रंगात नाहून निघाले होते. मुंबईकरांच्या स्पिरिटचे सोशल मीडियावर कौतुक होतेय. सोशल मीडियावर टीम इंडियाच्या स्वागातासाठी उभे असणाऱ्या चाहत्यांचा उत्साह दिसून येतोय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.