IND vs NZ T20 Series : टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच पार पडली. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाला. ज्यानंतर भारताचं आव्हान संपुष्टात आलं. आता टीम इंडिया पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असेल. भारत न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी20 आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. दरम्यान यातील पहिला सामना उद्या अर्थात 18 नोव्हेंबरला पार पडणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया न्यूझीलंडला पोहोचली देखील असून सध्या कसून सराव करत आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे सरावादरम्यानचे फोटो शेअर देखील केले आहेत. 









भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसंच काही खेळाडू संघात पुनरागमनही करत आहेत.  


कधी, कुठे पाहू शकता सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता खेळवला जाणार आहे. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 


कसे आहेत दोन्ही संघ? 


भारतीय संघ :
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.


न्यूझीलंड संघ :
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी


हे देखील वाचा-