Axar Patel: टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने (Axar Patel) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षर पटेल लवकरच बाबा होणार आहे. अक्षर पटेलने पत्नी मेहा पटेल सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे. अक्षरने काही दिवसांआधीच कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये एका प्रश्नावर लवकरच बाबा होणार असल्याचे संकेत दिले होते. कपिल शर्माच्या या शोमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे देखील सहभागी झाला होता.


अक्षर पटेलची (Axar Patel) पत्नी मेहा पटेल एक न्यूट्रिशनिस्ट आहे. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. आता अक्षर आणि मेहा पटेलची ही जोडी नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. अक्षरने पत्नीसोबत फोटोशूटही केले आहे. त्याने बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी दोघांचेही कुटुंबीय उपस्थित होते. व्हिडीओसोबत अक्षर पटेलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, खूप आनंद येणार आहे.






अक्षरने 2011 मध्ये अक्षरला प्रपोज केल्यानंतर 10 वर्षांनी मेहाशी लग्न केलं. बऱ्याच वर्षांच्या मैत्रीनंतर 28व्या वाढदिवशी अक्षरने सर्वांसमोर गुडघ्यावर बसून मेहाला प्रपोज केलं होतं. पण त्यांनी घाई न करता 11 वर्षांनी लग्न केलं. दरम्यान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी अक्षरने अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच टी-20 विश्वचषकात देखील अक्षर पटेची भूमिका महत्वाची राहिली. दरम्यान, अक्षर क्रिकेट आणि ब्रँड्सशी सहयोगातून भरपूर कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती ही 49 कोटी आहे.


कोण आहे मेहा पटेल?


अक्षर पटेलच्या पत्नीचे नाव मेहा पटेल आहे. अक्षर आणि मेहा एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. या दोघांनी सुरुवातीला आपले नाते मीडियापासून दूर ठेवले. जेव्हा अक्षर पटेलने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याची माहिती दिली तेव्हा मेहाची पहिल्यांदाच ओळख झाली. अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल ही न्यूट्रिशिअन आणि डायटेशन आहे. अक्षरने २० जानेवारीला त्याच्या वाढदिवशी मेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. मेहा पटेलचे इंस्टाग्रामवर 21 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. विशेष म्हणजे मेहा पटेलच्या हातावर अक्षरच्या नावाचा टॅटूही आहे.


संबंधित बातमी:


5 वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती; द. अफ्रिकेचा कोच फिल्डिंगसाठी मैदानात उतरला, झेप घेत चेंडू अडवला, Video