India Tour of Australia Border Gavaskar Trophy : भारतीय क्रिकेट संघ वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया बॉर्डर-गावसकर मालिकेअंतर्गत 5 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेबद्दल क्रिकेट जगत कमालीचे उत्सुक असून दोन्ही देशांकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत. 


दरम्यान, या महत्त्वाच्या दौऱ्याबाबत टीम इंडियाकडून मोठी बातमी समोर येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेची तयारी लक्षात घेता टीम इंडिया किमान दोन आठवडे अगोदर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. एवढेच नाही तर टीम इंडिया आपल्या 'अ' संघातील खेळाडूंविरुद्ध एक किंवा दोन 'इंट्रा स्क्वॉड' सराव सामनेही खेळणार आहे.


भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत खेळवला जाईल. या मालिकेनंतर अवघ्या काही दिवसांनी टीम इंडिया मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.


ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर भारतीय संघ भारत अ संघासोबत चार दिवसीय सामना खेळू शकतो. यामुळे टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यापूर्वी कंडिशनमध्ये आत्मपरीक्षण करण्याची चांगली संधी मिळेल. भारत अ संघ 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्याची शक्यता आहे. ॲडलेडमध्ये 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ 30 नोव्हेंबर रोजी कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे गुलाबी चेंडूने दोन दिवसीय दिवस-रात्र सराव सामना खेळेल.


भारताचा ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पुढीलप्रमाणे -


पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी


बऱ्याच काळानंतर बॉर्डर-गावसकर मालिकेत 2024-25 मध्ये 5 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेअंतर्गत शेवटच्या वेळी 1991-92 मध्ये 5 कसोटी सामने खेळले गेले होते. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल.


हे ही वाचा -


Mumbai Indians : सूर्याची IPL मध्ये सॅलरी दुप्पट, अंबानींची पर्स होणार रिकामी; मुंबई इंडियन्स देणार इतके कोटी?


Champions Trophy 2025 : पीसीबीची पुन्हा नाचक्की; टीम इंडिया नाही जाणार पाकिस्तानात, 'या' देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल?