IND vs BAN: मीरपूरमध्ये याआधीही दोन कसोटी सामने खेळली आहे टीम इंडिया, कसा आहे रेकॉर्ड, वाचा सविस्तर
Mirpur Test : भारतीय संघ मिरपूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळत असून याआधीच्या दोन्ही सामन्यांतही भारत वरचढ राहिला आहे.
Team India's Stats at Mirpur: मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. या मैदानावर टीम इंडियाने यापूर्वी देखील दोन कसोटी सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने (team india) सहज विजय मिळवला आहे. त्यामुळए आजच्या सामन्यातही टीम इंडियाचा दबदबा असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतल्यानं भारत गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
टीम इंडियाचा एक डाव आणि 239 धावांनी तगडा विजय
भारतीय संघाने मे 2007 मध्ये या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला होता. पहिल्या डावात दिनेश कार्तिक, वसीम जाफर, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या शतकांमुळे टीम इंडियाने 3 गडी गमावून 610 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघाला खास कामगिरी करता आली नाही. त्यांचा पहिला डाव 118 धावांत आटोपला तर फॉलोऑननंतर त्यांचा दुसरा डाव 253 धावांवर आटोपला. ज्यामुळे टीम इंडियाचा एक डाव आणि 239 धावांनी तगडा विजय झाला.
दुसऱ्या सामन्यात 10 गडी राखून मिळवला विजय
जानेवारी 2010 मध्ये मीरपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिला डाव 8 विकेट गमावून 544 धावांवर घोषित केला. यावेळी बांगलादेश संघाचा दुसरा डाव 312 धावांवर आटोपला. ज्यानंतर भारतीय संघानं 2 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून जिंकले.
मीरपूरमध्ये या भारतीय खेळाडूंचा दमदार रेकॉर्ड
मीरपूरमध्ये सर्वाधिक धावा (265) करणारा सचिन तेंडुलकर हा भारतीय फलंदाज आहे. राहुल द्रविड (240) आणि एमएस धोनी (140) हे येथे नंबर-2 आणि नंबर-3 वर असणामरे भारतीय फलंदाज आहेत. झहीर खान गोलंदाजीत सर्वाधिक (17) बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्यानंतर अनिल कुंबळे (5) आणि इशांत शर्मा (5) यांचा नंबर लागतो.
दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-