IND vs WI ODI Series : भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु असून यातील पहिल्या सामन्यात शिखर धवन हा कर्णधार म्हणून मैदानात उतरताच भारताने एक नकोसा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) यंदाच्या वर्षात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार होताच यंदाच्या वर्षात हा भारताचा सातवा कर्णधार आहे. याआधी 2017 मध्ये श्रीलंका संघाने एका वर्षात 7 वेगवेगळे कर्णधार ठेवले होते, ज्यानंतर आता भारताने हा नकोसा रेकॉर्ड नावे केला आहे.


यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये तो संघाचा कर्णधार होता. यावेळी एका सामन्यात तो नसताना केएळ राहुलला कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर एकदिवसीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे असताना तो दुखापतग्रस्त होताच केएल राहुल कर्णधार झाला. रोहित पुन्हा फिट होताच मार्च दरम्यान श्रीलंकेच्या भारत दौऱ्यावेळी रोहित पुन्हा कर्णधार झाला. आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत पुन्हा रोहित विश्रांतीवर गेला आणि केएल राहुल कर्णधार झाला. पण सामन्यांपूर्वीच तो दुखापतग्रस्त झाल्याने ऋषभ पंतकडे ही जबाबदारी गेली.


पण पंत इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायला गेला ज्यामुळे हार्दिक पांड्याला आयर्लंडविरुद्ध कर्णधार करण्यात आलं. त्यानंतर इंग्लंड कसोटीत रोहित कोरोनाबाधित आणि राहुल दुखापतग्रस्त झाल्याने जसप्रीत बुमराहला कर्णधार करण्यात आलं. आता वेस्ट इंडीजविरुद्ध दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याने शिखर धवन कर्णधार झाला आणि यंदाच्या वर्षात भारताने सातवा कर्णधार खेळवला. 


हे देखील वाचा-