Yonex Taipei Open 2022: तैपई ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची मिश्र दुहेरी जोडी तनिषा क्रास्टो आणि इशान भटनागर (Ishaan Bhatnagar and Tanisha Crasto) यांच्या पदरात निराशा पडली. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या हू पांग रॉन (Hoo Pang Ron) आणि तो ई वेई (Toh Ee Wei) दुहेरी मिश्र जोडीनं भारताचा 19-21, 12-21 असा पराभव केला. या पराभवानंतर तनिषा क्रास्टो-इशान भटनागर यांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. 


या सामन्यात ईशान भटनागर आणि तनिषा क्रॅस्टो यांनी वेगवान सुरुवात केली. परंतु,मलेशियन जोडीनं मध्यंतरात 11-7 अशी आघाडी घेत चार गुणांचा फायदा घेतला आणि पहिला सेट 21-19 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटच्या सुरुवातीपासून मलेशिया जोडीनं आक्रमक खेळी करत भारतावर दबाव निर्माण प्रयत्न केला, ज्याचा फायदा त्यांना मिळाला. दुसऱ्या सेटमध्ये मलेशियानं भारताला 21-12 असं पराभूत केलं. या पराभवानंतर भारताची मिश्र दुहेरी जोडी ईशान भटनागर- तनिषा क्रॅस्टो स्पर्धेतून बाहेर झालीय. तनीषा- इशान भटनागर दुहेरी मिश्र जोडीनं तैपेईच्या चेंग काय वेन आणि वांग यु क्विओ जोडीविरुद्ध 21-14, 21-17 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.


पारूपल्ली कश्यप आता मलेशियाच्या सूंग जू वैनशी भिडणार
तैपेई ओपनमध्ये एकमेव भारतीय बॅटमिंटनपटू पारुपल्ली कश्यपनं या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलंय. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पारुपल्ली कश्यपचा सामना आज उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या सूंग जू वेनशी होणार आहे.


महिला दुहेरीत तिनिषा क्रास्टो आणि श्रुती मिश्राचा सामना कोणाशी?
महिला दुहेरीत भारताच्या तनिषा क्रास्टो आणि श्रुती मिश्रा उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या एनजी त्स्झ याऊ आणि त्सांग हिउ यान यांच्याशी भिडतील, जे सहाव्या मानांकित आहेत. भारतीय जोडीनं दुसऱ्या फेरीत चायनीज तैपेईच्या लिन जिया-यिन आणि लिन यू-हाओ यांचा पराभव केला होता. 


हे देखील वाचा-