एक्स्प्लोर

World Cup 2019 । यजमान इंग्लंडकडून टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव, रोहित शर्माचे शतक व्यर्थ

यानंतर हार्दिक पटेलने धोनीच्या साथीने वाढलेल्या धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो (45) बाद झाला. धोनीने (42) तर केदार जाधवने () धावा केल्या. इंग्लंडकडून लीम प्लंकेटने तीन तर क्रिस वोक्सने दोन विकेट्स घेतल्या.

बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. या विश्वचषकातला टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव  ठरला. रोहित शर्माचे शतक आणि विराट कोहलीचे अर्धशतक तसेच हार्दिक पांड्याची जिगरबाज खेळी या पराभवामुळे व्यर्थ ठरली. या विजयानंतर  इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर लोकेश राहुल भोपळाही न फोडता बाद झाला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाला सावरले. विराट कोहली (66) धावा करून बाद झाला. यानंतर सुरुवातीला धीम्या गतीने खेळत असलेल्या रोहित शर्माने वेगाने धावा करत आपले वर्ल्डकपमधील  तिसरे शतक साजरे केले. शतक झळकावल्यानंतर रोहित 102 धावांवर बाद झाला.  विजय शंकरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतने (32) धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पटेलने धोनीच्या साथीने वाढलेल्या धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो (45) बाद झाला. धोनीने (42) तर केदार जाधवने (12) धावा केल्या. इंग्लंडकडून लीम प्लंकेटने तीन तर क्रिस वोक्सने दोन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बेन स्टोक्स, जेसन रॉयच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान इंग्लंडने सात बाद 337 धावांपर्यंत मजल मारली होती. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने  160 धावांची शतकी सलामी देत इंग्लंडच्या धावसंख्येचा पाया मजबूत केला होता.  जेसन रॉय 57 चेंडूंत 66 धावा करुन बाद झाला होता. मग बेअरस्टोनं ज्यो रूटच्या साथीनं इंग्लंडच्या डावाला गती देत त्यानं वन डे कारकीर्दीतलं आपलं आठवं शतक साजरं केलं. त्यानं 90 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकून शतकाला गवसणी घातली. तर 109 चेंडूत 111 धावांची खेळी केली. बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं.  दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला.  भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.  कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
Aus vs Ban 2nd Test Mitchell Starc : मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
मैदानात आले, मिनिटांत पुन्हा गेले... मिचेल स्टार्कने फलंदाजांचं कंबरडं मोडलं, 12 धावांवर बांगलादेशचा अर्धा संघ आऊट, नेमकं काय घडलं?
Ind vs Sl 2nd Test : पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
पहिल्या कसोटीत पराभव होताच श्रीलंकेने 3 जणांना बाहेर काढलं, टीम इंडियाविरुद्ध आता जाहीर केला नवा Squad, चक्रावून टाकणाऱ्या खेळाडूंची एन्ट्री
Embed widget