India vs Bangladesh 2022 : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या बांग्लादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील (IND vs BAN ODI Series) दोन सामने झाले असून एक सामना शिल्लक आहे. ज्यानंतर टीम इंडिया 14 डिसेंबरपासून बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) मुकण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे आधीच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून तो बाहेर झाला, ज्यानंतर अजून तो पूर्णपणे दुखापतीतून सावरला नसल्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत (Test Series) तो खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. शमी बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये आहे आणि तिथून आलेल्या अहवालात तो अद्याप ठिक झाला नसल्याचं समोर आलं आहे.  

भारतीय संघ (Team India) आधीच बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजीत संघर्ष करत आहे आणि कसोटी मालिकेपूर्वी शमीची अनुपस्थिती भारातासाठी मोठा धक्का आहे. 32 वर्षीय शमी गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. बांगलादेश मालिकेसाठी तो सुरुवातीला एकदिवसीय संघाचा भाग होता, परंतु त्याला माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी उमरान मलिकचे नाव घेण्यात आले. आता कसोटी सामन्यांसाठी तो मुकल्यावर त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल हे देखील पाहावे लागेल. 

बांग्लादेशविरुद्ध कसोटी संघ?

रोहित शर्मा (कर्णधार)/ अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.  

भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर  झहूर अहमद चौधरी स्टेडियम
दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

हे देखील वाचा-