श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज लग्नबंधनात अडकला; पहिला फोटो आला समोर
भारताचा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया विवाहबद्ध झाला आहे.
Indian Pacer Chetan Sakariya Married: भारताचा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया (Chetan Sakariya) विवाहबद्ध झाला आहे. टीम इंडियाला या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे, मात्र त्याआधीच चेतनने लग्नाची गाठ बांधली आहे. चेतनच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
A beautiful picture from Chetan Sakariya and Meghna's wedding ❤. pic.twitter.com/CJaeLfGcwh
— Jay Cricket. (@Jay_Cricket18) July 15, 2024
चेतनच्या पत्नीचे नाव मेघना जंबुचा आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चेतनचा साखपुडा झाला होता आणि आता लग्नसोहळा पार पडला. साकारियाच्या लग्नाला त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही उपस्थित होता. चेतनचे अभिनंदन करताना, जयदेव उनाडकट फोटो पोस्ट करत म्हणाला की, "प्रिय चेतन, तुझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मी तुला काही भेदक चेंडू टाकताना आणि सामने जिंकताना पाहिले आहे. पण साहजिकच हा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा स्पेल असेल...
View this post on Instagram
आयपीएलमध्ये सध्या केकेआरच्या ताफ्यात-
चेतन 2024 च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. त्याला या मोसमात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी, चेतनने 2023 च्या आयपीएलमध्ये केवळ दोन सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. चेतन 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.
भारताकडून एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण-
चेतनने भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील खेळले आहे. त्याने आतापर्यंत 1 वनडे आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चेतनने एकमेव एकदिवसीय सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या 1 डावात त्याने 1 विकेट्स घेतली आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 9.27 च्या इकॉनॉमीने धावा केल्या. चेतनने जुलै 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तथापि, केवळ 1 एकदिवसीय आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर चेतन पुन्हा टीम इंडियाच्या संघात पुनरागमन करु शकला नाही. चेतन श्रीलंकेविरुद्ध दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळला. आता चेतनला आयपीएलमध्येही कमी संधी मिळत आहेत.
चेतनचा गरिबीशी संघर्ष
डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया साधारण कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन आला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे वडील टेम्पोचालक होते. तर पाच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या घरात टीव्हीदेखील नव्हता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्याच्या चुलत्याने त्याला त्यांच्या दुकानात काम करायला सांगितले आणि त्याच्या शिक्षण आणि खेळाचा खर्च उचलला. आता चेतनने आयपीएल खेळून कुटुंबाचं नशीब उजळवलं.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'