Taruwar Kohli Retirement News: काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या अंडर 19 वर्ल्डकप 2024 (Under 19 World Cup 2024) च्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कांगारूंनी (IND vs AUS) मोठ्या शिताफिनं पराभव केला. पम, भारतीय युवा क्रिकेट संघाच्या पोरांनी साऱ्यांची मनं जिंकली. पण जरा मागे वळून पाहिलं तर, यापूर्वी टीम इंडिया पाच वेळा अंडर 19 वर्ल्डकप जिंकली आहे. भारतीय युवा क्रिकेट संघाच्या विजयापैकी एक विजय म्हणजे, 2008 मध्ये अंडर 19 टीम इंडियानं जिंकलेला वर्ल्डकप. हा विजय खास आहे कारण, टीम इंडियाचं रनमशीन म्हणून ओळख असणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वात अंडर 19 क्रिकेट संघानं या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ज्या अंडर 19 संघाचा कर्णधार विराट कोहली होती, त्याच संघात आणखी एक कोहली होता. त्याचं नाव तरुवर कोहली. 2008 मधील अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेतील धमाकेदार ओपनर, भारतीय युवा क्रिकेट संघाचा हुकुमाचा एक्का. पण एकेकाळी भारतीय युवा क्रिकेट संघाची आन-बान-शान असणाऱ्या तरुवर कोहलीनं (Taruwar Kohli) निवृत्ती (Taruwar Kohli Retirement) जाहीर केली आहे.
तरूवर कोहली हा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक उत्कृष्ट खेळाडू, पण दुर्दैवानं त्याला टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. तिहेरी शतकही त्याच्या नावावर आहे. नाबाद 307 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 53 होती आणि त्यानं 14 शतकंही झळकावली आहेत.
कोण आहे तरुवर कोहली? (Who Is Taruwar Kohli?)
तरुवर कोहली हा उजव्या हाताचा फलंदाज होता. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1988 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. तरुवर उत्तम गोलंदाजीही करायचा. तो उजव्या हाताचा मध्यम गोलंदाजही होता. आयपीएल 2008 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सनं तरुवरला विकत घेतलं होतं. त्यानंतर 2009 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचा पंजाब किंग्ज) चा देखील तरुवर कोहली महत्त्वाचा भाग होता. तरूवरचे वडील सुशील कोहली हे सुद्धा स्पोर्ट्स पर्सन होते, पण ते जलतरणपटू होते.
तरुवर कोहली आयपीएलमध्ये मात्र आपली छाप सोडू शकला नाही. 2009 - 2010 नंतर त्याचं नाव हळूहळू क्रिकेट जगतातून गायब झालं. त्यानंतर 2013 रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना तिहेरी शतक झळकावून तो पुन्हा चर्चेत आला.
फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए रेकॉर्ड्स
तरुवर कोहलीबाबत बोलायचं झालं तर त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 55 सामने खेळले आणि 97 डावांत 4573 धावा केल्या. त्याच्या नावावर 74 विकेट्सही आहेत. याव्यतिरिक्त लिस्ट एमध्ये कोहलीनं 72 सामने खेळताना 1913 धावा केल्यात. फर्स्ट क्लासमध्ये तरुवरनं 14 शतकं आणि 18 अर्धशतकं 53.8 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त यादीत त्याचं नाव 3 शतकं, 11 अर्धशतकांसह 41 विकेट्सही आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :