IND vs Eng Test : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) मालिकेतील चौथा सामना झारखंडची राजधानी रांची येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, हा सामना बंद पाडणार अशी धमकी खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने दिली आहे. आदिवासींच्या जमिनीवर क्रिकेट खेळू देऊ नका, असे आवाहन भाकपला करत शीख फॉर जस्टीस या संघटनेने धमकी दिलीशा आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. धमकीचा ऑडिओ आणि व्हिडीओ व्हेरीफाय केला जात आहे. शिवाय या प्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय. 


बेन स्टोक्स याला इंग्लंडला परत जाण्याची धमकी


शीख फॉर जस्टीसच्या गुरपतवंत सिंग पन्नूचा युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील चौथा कसोटी सामना रद्द करण्याच्या उद्देशाने त्याने भारतीय कम्युनिष्ट पक्षाला आवाहन केले आहे. भाकपने झारखंड आणि पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करावी, असे आवाहन करताना तो दिसतोय. जेणेकरुन भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांना हा सामना खेळता येऊ नये, याबाबत एफआयरमध्ये स्पष्टपणे नोंद करण्यात आली आहे. शीख फॉर जस्टीसच्या गुरपतवंत सिंग हा पंजाबचा राहिवासी आहे. मात्र, तो सध्या अमेरिकेत आहे. या व्हिडीओतून त्यांने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला इंग्लंडला परत जाण्याची धमकी दिली आहे. एफआयआरमध्ये याचा उल्लेख दहशतवादी कारावायांमध्ये करण्यात आलाय. 


धमकी देताना व्हिडीओमध्ये काय म्हणालय पन्नू?


या व्हिडीओमध्ये गुरपतवंत सिंग हा भाकपला उकसवताना दिसत आहे. तो म्हणतोय की, आदिवासींच्या जमिनीवर क्रिकेट खेळू देऊ नका. शासनाने दोन देशांमधील खेळातील मैत्रीपूर्ण संबंध बिघडवणे आणि मावोवादी संघटनेच्या मदतीने सामन्यावर परिणाम घडवून आणण्याचे षडयंत्र म्हणून पाहत आहे. अशा प्रकरचा व्हिडीओमुळे सरकारला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे एफआयरमध्ये म्हटले आहे.


पन्नूच्या व्हिडीओची सत्यता तपासली जाणार


रांचीचे एसपी चंदन सिन्हा याबाबत बोलताना म्हणाले, "रांचीच्या धुर्वा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, पन्नूच्या या व्हिडीओची सत्यता तपासली जाणार आहे.  ही धमकी विचारात घेऊन सुरक्षेबाबत यंत्रणा सतर्क आहे. "


इतर महत्वाच्या बातम्या 


India vs England, Ben Stokes : भारताकडून धुळदाण होताच बेन स्टोक्सने अंपायरिंगवर उपस्थित केले सवाल, आयसीसीकडे मोठी मागणी