चेन्नई : आयपीएल (IPL) सुरु झाल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी राज्य पातळीवर क्रिकेट लीग सुरु आहेत. देशातील विविध राज्यात टी 20 क्रिकेट लीग सुरु असतात. तामिळनाडू प्रीमियर लीग 2024 (Tamil Nadu Premier League 2024) सुरु आहे. या स्पर्धेच्या एका सामन्यात भलताच प्रकार घडला. चेपॉक सुपर गिल्लीज आणि सिचेम मदुराई पँथर्स यांच्यातील मॅच एनपीआर कॉलेज ग्राऊंड दिंडीगुल येथे सुरु होती. या मॅचमध्ये एक वेगळाच प्रकार घडला, याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. 


तामिळनाडू प्रीमियर लीगच्या 27 व्या मॅचमध्ये हा प्रकार घडला डावखुऱ्या फलंदाजानं षटकार मारला. हा षटकार थेट ग्राऊंडबाहेर गेला. ग्राऊंडबाहेर एका चाहत्याला  बॉल मिळाला. बॉल मिळताच त्या चाहत्याचे सूर बदलले. त्यानं बॉल देण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार स्टार स्पोर्टसनं ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. 



सिंचेम मदुराई पँथर्सनं ही मॅच नऊ धावांनी जिंकली. या संघाचा विकेटकीपर सुरेश लोकेश्वरनं प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिकंला. त्यानं 40 बॉलमध्ये 55  धावा केल्या. पहिल्यांदा फलंदाजी करताना मदुराई पँथर्सनं 20 ओव्हरमध्ये 4 बाद 191 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेपॉक सुपर गिल्लीजनं 8 विकेटवर 182 धावा केल्या. पी. रंजन पॉल आणि संतोष के दुराईसामी यांनी  चांगली फलंदाजी केली. पी . रंजन पॉलनं 52  धावा तर संतोष कुमारनं 48 धावा केल्या होत्या. मात्र, ते दोघे संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. 



दरम्यान, लायका कोवई किंग्ज आणि आयड्रीम त्रिपूर तमिझन्स यांच्यात क्वालिफायर 1 ची मॅच 30 जुलै रोजी होणार आहे. तर, दिंडीगुल ड्रॅगन्स आणि चेपॉक सुपर गिल्लीज यांच्यात एलिमिनेटरची मॅच होणार आहे. दरम्यान, तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेची अंतिम फेरीची लढत 4 ऑगस्टला होणार आहे.  गेल्या वर्षी लायका कोवई किंग्जनं स्पर्धा जिंकली होती. 


पाहा व्हिडीओ : 






संबंधित बातम्या :


IPL Auction 2025: केकेआर मेगा ऑक्शनपूर्वी मोठा डाव टाकणार, चार खेळाडूंना रिटेन करणार, भारतीय अन् विदेशी खेळाडूंवर विश्वास ठेवणार


Team India : भारताच्या विश्वविजयाला एक महिना पूर्ण, बीसीसीआयची खास पोस्ट, रोहित ते बुमराहसह पाच जणांना मानाचं स्थान