नवी दिल्ली: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy) आयोजन पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करणार आहे. आयसीसीला पाकिस्ताननं दिलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. सुरक्षेच्या कारणामुळं भारतानं (Team India) पाकिस्तानमध्ये (Pakistan) क्रिकेट खेळण्याऐवजी दुबई आणि श्रीलंकेत सामने खेळवले जावेत, अशी भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी थेट भारताला चॅलेंज दिलं आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदनं (Tanvir Ahmed) भारताला चॅलेंज दिलं.  तन्वीरनं हरभजन सिंगला उत्तर देता देता धमकी देखील दिली. 


काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं सुरक्षेचा दाखला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जाऊ नये, असं म्हटलं. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदनं यावर उत्तर देताना हरभजन सिंगला धमकी दिली आहे. तो म्हणाला, "आम्ही लोकं शेर आहोत, तुमच्या देशात येऊन खेळून गेलो. तुम्ही येऊन दाखवा, आम्ही म्हणतोय इथं या खेळून दाखवा, सुरक्षेसह सर्व गोष्टी तुम्हाला देऊ, एकदा येऊन तर दाखवा", असं तन्वीर अहमदनं म्हटलं.  


एकीकडे पाकिस्तानला आयसीसीच्या गेल्या दोन वर्षातील स्पर्धांमध्ये अपयश आलं आहे. वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान पहिल्या फेरीतून बाहेर पडलं होतं. यानंतरही तन्वीर अहमदनं टीमला सपोर्ट करत वक्तव्य केलं. तो म्हणाला, "हे फक्त पाकिस्तानी खेळाडूंचं काम आहे. फक्त पाकिस्तानी खेळाडू तिथं येऊन खेळून जातात, मग ते जिंकले किंवा पराभूत झाले, मात्र ते भारतात जाऊन खेळून परत आले, याला म्हणतात साहसी खेळाडू आणि साहसी टीम, असं तन्वीर अहमद म्हणाला. 


भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह  


भारतानं 2023 मध्ये झालेल्या आशिया कपच्या वेळी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी भारताचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्तानं भारत जुन्या भूमिकेवर ठाम आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलेलं नाही. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतानं पाकिस्तानला जायचा निर्णय घेतल्यास तब्बल 16  वर्षानंतर भारतीय संघ पाकिस्तानला जाईल. भारतानं भूमिका काय ठेवल्यास हायब्रीड मॉडेलनुसार देखील सामने खेळवले जाऊ शकतात. भारतानं दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याबाबत भूमिका घेतली आहे. पीसीबीनं भारताचे सामने लाहोरमध्ये प्रस्तावित केले होते. भारत आणि पाकिस्तान मॅच 1 मार्च 2025 रोजी प्रस्तावित करण्यात आली आहे.  




संबंधित बातम्या :


Team India : भारताच्या विश्वविजयाला एक महिना पूर्ण, बीसीसीआयची खास पोस्ट, रोहित ते बुमराहसह पाच जणांना मानाचं स्थान


ENG vs WI: बेन स्टोक्सचे वेस्ट इंडिजविरुद्ध ऐतिहासिक अर्धशतक; तब्बल 43 वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम