IPL 2025 Rajasthan Royals: आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने काही दिवसांपूर्वी राहुल द्रविड यांची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. आता राजस्थान फ्रँचायझीने विक्रम राठोड यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून समावेश केला आहे. विक्रम राठोड हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक राहिले आहेत. राहुल द्रविड यांनीही विक्रम राठोड यांच्यासोबत पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. 




2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर विक्रम राठोड यांचा कार्यकाळ संपला होता. आता ते राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाले आहेत. राहुल द्रविड आणि विक्रम राठोड या जोडीने 2023 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आणि 2024 टी-20 विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावली होती. टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात राहुल द्रविडसह विक्रम राठोड यांची भूमिका देखील खूप महत्वाची होती. 






विक्रम राठोड काय म्हणाले?


राजस्थानचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विक्रम राठोड म्हणाले की, राजस्थान रॉयल्स कुटुंबाचा एक भाग बनणे हा एक माझ्यासाठी सन्मान आहे. राहुल द्रविडसोबत पुन्हा काम करणे हा बहुमान आहे आणि युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. यावेळी मी संघाच्या वाढीसाठी योगदान देण्यासाठी आणि राजस्थान आणि भारतासाठी उत्कृष्ट प्रतिभा आणण्यासाठी वचनबद्ध आहे, असं विक्रम राठोड यांनी सांगितले.


विक्रम राठोड यांचे टीम इंडियात मोलाचे योगदान-


विक्रम राठोड यांचे 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाले. 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी, त्यांनी ऋषभ पंत, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांना यश मिळविण्यात आणि नवीन उंची गाठण्यात मदत केली आहे.


रिकी पाँटिंग दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक-


इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या आधी पंजाब किंग्जने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन रिकी पाँटिंगची नियुक्ती करण्यात आली आहे. रिकी पाँटिंग याआधी दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक होता.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: पहिले जसप्रीत बुमराह, मग आकाश दीप; बांगलादेशच्या 3 फलंदाजांची दांडी गुल, स्टम्प उडाले, Video


Ind vs Ban: टीम इंडियाला चुणूक लागलेली, विशेष सरावही केला; पण तो आला अन् कहर माजवला, कोण आहे हसन महमूद?