मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Election 2024) धामधुमीत टी 20 विश्वचषकाच्या थरार (T20 world cup) रंगण्यास सुरुवात झाली आहे. 1 जूनपासून ICC T20 वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार असताना, दुसरीकडे भारताची वर्ल्डकपमधील पहिली मॅच 5 जूनला होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडसोबतच्या सामन्याने विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली आहे. भारतीय संघाची घोषणा आजच करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने 15 जणांचा संघ जाहीर केला. याशिवाय तीन खेळाडू राखीव म्हणून निवडण्यात आले आहेत. 

भारतीय संघात अपेक्षेप्रमाणे रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांना संधी मिळाली आहे. तर टीम इंडिया ऋषभ पंत आणि संजू सॅमसन  या दोन विकेटकीपरसह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्यासह रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळाली आहे. 

टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचे सामने कधी?

टी20 वर्ल्ड कपमध्ये  भारताचं स्थान अ गटात आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9  जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस आणि चौथी मॅच 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.   

लोकसभा निवडणुकीचा थरार

एकीकडे वर्ल्डकपचा थरार सुरु झाला असताना, दुसरीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होत आहे. तर देशात सात टप्प्यात मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. 

9 जूनला पाकिस्तानविरुद्ध सामना

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात येणार आहे. 

विश्वचषकाचा गट असा असेल 

  • अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
  • ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
  • क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
  • ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ

वर्ल्डकपसाठी टीम इंडिया

फलंदाज - 4

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, 

अष्टपैलू - 4

हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल,शिवम दुबे,

विकेट कीपर - 2

ऋषभ पंत  , संजू सॅमसन  ,  

फिरकीपटू -2

कुलदीप यादव, युजवेंद्र चहल ,  

वेगवान गोलंदाज - 3

अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.  

 

भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्र

ICC Men’s T20 World Cup 2024 – India’s Fixtures (Group A matches)

Date

Day

Match

Venue

05-June-24

Wednesday

India vs Ireland

Nassau County International Cricket Stadium, New York

09-June-24

Sunday

India vs Pakistan

Nassau County International Cricket Stadium, New York

12-June-24

Wednesday

USA vs India

Nassau County International Cricket Stadium, New York

15-June-24

Saturday

India vs Canada

Central Broward Park & Broward County Stadium, Lauderhill

 

संबंधित बातम्या 

हार्दिक पांड्या उपकर्णधार, शिवम दुबेला संधी, राहुलला झटका, विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड   

एक धोनीच्या तालमीत वाढला, एकाने थेट राजस्थानचं नेतृत्व केलं, संजू, शिवमचा टीम इंडियात सहभाग; संधीचं सोनं करणार?