एक्स्प्लोर

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? या दिवशी संघ जाहीर होण्याची शक्यता

Team India : आगामी वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये केली जाऊ शकते. कॅप्टन रोहित शर्मा आणि निवड समितीचे सदस्य पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेतील.

नवी दिल्ली : आयपीएल (IPL) संपल्यानंतर एक जूनपासून टी-20 वर्ल्डकप (T 20 World Cup) पासून वेस्ट इंडिजमध्ये सुरु होणार आहे.या वर्ल्ड कपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका संयुक्तपणे करणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार सर्व संघांना टीमची घोषणा 1 मेपर्यंत करायची आहे. पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या टीममध्ये (Team India) कुणाला संधी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मीडिया रिपोर्टसनुसार निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांचे लवकरच बैठक होऊ शकते. या बैठकीत वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. 

27 किंवा 28 तारखेला दिल्लीत बैठक

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार निवडसमितीचे सर्व सदस्य  27 आणि 28 एप्रिलला दिल्लीत बैठक घेऊ शकतात. 27 एप्रिलला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. या मॅचसाठी रोहित शर्मा देखील दिल्लीत असेल. त्यामुळं रोहित शर्मा, निवड समितीचे सर्व सदस्य आणि प्रशिक्षक वर्ल्ड कपच्या टीमवर शिक्कामोर्तब करु शकतात. निवड समितीचा प्रमुख अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये आहे. स्पेनवरुन दिल्लीला येऊन तो संघ निवडीच्या बैठकीत सहभागी होऊ शकतो. 

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज यांचं संघात स्थान पक्कं असल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू फिट असले तर त्यांना संघात स्थान मिळू शकतं. याशिवाय हार्दिक पांड्याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याचं प्रदर्शन कसं राहतं यावर त्याची निवड अवलंबून असेल. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या चांगली कामगिरी करु शकलेला नाही. 

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येकी पाच संघांचा चार ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये असेल. यामध्ये भारताशिवाय पाकिस्तान, यूएसए, कॅनडा आणि आयरलँड आहे. भारताची पहिली मॅच 5 जूनला होणार आहे. भारतापुढं आयरलँडचं आव्हान असेल. तर, हायव्होल्टेज भारत पाकिस्तान लढत 9 जूनला होणार आहे.  

संबंधित बातम्या :

IPL 2024 Rishabh Pant : मर्सिडीज, फोर्डसारख्या महागड्या गाड्या, दिल्लीत आलिशान घर; करोडपती ऋषभ पंतकडे संपत्ती किती?

 IPL 2024 : ना रोहित ना विराट! आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगानं कोण पाडतंय धावांचा पाऊस? टॉपरचं नाव वाचून धक्का बसेल!   

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Embed widget