T20 World Cup 2024 Hat Tricks: टी-20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 मधील चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना एंटीगुआमधील सर विवियन रिचर्ड्स मैदानावर सुरु आहे. बांगलादेशने डावाची सुरुवात चांगली केली होती. मात्र धावा चेंडूच्या तुलनेने कमी सुरु होत्या. बांगलादेशने जेव्हा धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमाल दाखवत झटपट विकेट्स पटकावल्या. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) यंदाच्या टी-20 विश्वचषकात एक भीमपराक्रम आपल्या नावावर केला आहे. 


यंदाच्या टी-20 विश्वचषकामधील पहिली हॅट्रिक-


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 2024 मधील टी-20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-8 मधील सामन्यात पॅट कमिन्सने ही कामगिरी केली. पॅट कमिन्सने महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन आणि तौहीद हिरदॉयला बाद केले. 


पाहा हॅट्रिकचा संपूर्ण व्हिडीओ-






ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन-


ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवूड


बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन-


अंजिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), शाकिब अल हसन, तौहीद हिरदॉय, महमुदुल्लाह, महेदी हसन, रिशद हुसैन, तस्कीन अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार काय म्हणाला?


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल मार्श म्हणाले की, आम्ही प्रथम गोलंदाजी करतोय. चांगली विकेट असल्याचं दिसत आहे. आम्ही या मैदानावर याआधी एक सामना खेळला आहे. त्यावेळी देखील चांगली विकेट होती. आम्ही दोन बदलासह मैदानात उतरलोय, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला एगर आणि एलिसच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. 






संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 IND vs AFG: बुमराहने अफगाणिस्तानची हवा काढली, सूर्यकुमारने अर्धशतक ठोकले; भारताचा सुपर 8 मधील पहिला विजय


T20 World Cup 2024 IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले; BCCI ने सांगितलं भावनिक कारण