न्यूयॉर्क : आगामी टी-20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) स्पर्धेचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका  यांच्याकडून केलं जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या स्पर्धेत देखील एकाच गटात आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मालिका बंद असल्यानं केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच दोन्ही संघ आमने सामने येत असतात. आता पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जून रोजी होणार आहे. ही मॅच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. भारत पाकिस्तान ज्या मैदानावर होणार आहे त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.


मैदान सज्ज, किती प्रेक्षक मॅच पाहू शकणार? 


टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात हाय व्होल्टेज मॅच भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच नासाऊ कंट्री इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या मॅचपूर्वी या स्टेडियमवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. हाय व्होल्टेज लढतीसाठी मैदान सज्ज झालं आहे. या मैदानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 34 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था या मैदानावर करण्यात आलेली आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यामॅचमध्ये  प्रेक्षकांना विराट कोहली आणि पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीसह मोहम्मद अमीर यांचा सामना पाहायला मिळेल. 




टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोण वरचढ?


भारत आणि पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सातवेळा आमने सामने आले आहेत. भारतानं सहा मॅचमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे. केवळ एका मॅचमध्ये पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आलाय. 


भारत 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवणार?


टीम इंडियानं पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करत विजय मिळवला होता. त्यानंतर एकदाही भारताला टी-20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळालेलं नाही. यंदा रोहित शर्माच्या टीमकडे टी-20 वर्ल्डकपच्या विजेतेपदाचा गेल्या 17 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी भारताकडे आहे.


टी -20 वर्ल्ड कपमधील भारताचे सामने 


1 जूनपासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान अ गटात आहेत. भारताशिवाय आयरलँड, अमेरिका, पाकिस्तान आणि कॅनडाचा समावेश आहे.  भारताची पहिली मॅच 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9  जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस विरुद्ध 12 जून आणि चौथी 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे. 


संबंधित बातम्या : 


Irfan Pathan : संपूर्ण सीझन खेळायचं असेल तर या अन्यथा येऊच नका, आयपीएल अर्ध्यात सोडणाऱ्यांवर इरफान भडकला


IPL 2024 Playoffs : 4 दिवस, 5 संघ अन् 2 जागा... प्लेऑफचं समीकरण सोप्या भाषेत