Virat Kohli on India vs Pakistan Match: संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमान येथे होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कपमधील ( T20 World Cup) सर्वात मोठा सामना 24 ऑक्टोबर (रविवार) रोजी आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील या सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या महान सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले आहे.


कोहलीने त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे जे सामान्यतः प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे असते. प्रश्न असा आहे की तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घाबरला आहे का? कोहलीने नाही असं उत्तर दिलं आहे. त्याने ट्विट केले, की लोकं - रविवारी मोठा सामना, तुम्ही चिंताग्रस्त आहात का? मी - WROGN. WROGN एक प्रसिद्ध कपडे आणि अॅक्सेसरीज ब्रँड आहे. रिपोर्ट्सनुसार, कोहलीचाही यात मोठा वाटा आहे.




कोहलीच्या या ट्विटवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी कोहलीला त्याच्या अलीकडील फॉर्मची आठवण करून दिली. कोहली या सामन्यात 29 चेंडूत 33 धावा करेल असा अंदाज एका वापरकर्त्याने वर्तवला.










भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबरला महासंग्राम
टी 20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल. टीम इंडियाने आतापर्यंत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारलेला नाही. अशा परिस्थितीत विराट ब्रिगेड हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर पाकिस्तानची नजर विश्वचषकातील विजयाचा दुष्काळ संपवण्यावर असेल.