T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून या स्पर्धेच्या दोन्ही सराव सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच या स्पर्धेत भारत अशीच कामगिरी कायम ठेवेल, अशीही अपेक्षा केली जात आहे. याचदरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्याने नुकतीच पार पडलेल्या आयपीएलमध्ये गोलंदाजी केली नाही. तसेच विश्वचषकाच्या सराव सामन्यातही त्याला गोलंदाजीसाठी बोलवण्यात आले नाही. मात्र, हार्दिक पांड्याने आता नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच तो विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसेल, अशी आशा भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) व्यक्त केली आहे. 

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आला होते. हा सामना भारतीय संघाने 8 गडी राखून जिंकला होता. या सामन्यात नाणेफेक केल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिकला गोलंदाजी सुरू करण्यास थोडा वेळ लागेल. त्याने गोलंदाजी सुरू केली नाही. पण स्पर्धेदरम्यान तो कोणत्याही क्षणी तयार असणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू 100 टक्के तंदुरूस्त असणे गरजेचे असते. लवकरच हार्दिक गोलंदाजीला सुरुवात करेल, अशी आशा आहे, असेही रोहित शर्माने म्हटले आहे. 

 

विश्वचषकात शार्दुल ठाकूरचा 15 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे हार्दिकच्या गोलंदाजीवर सस्पेन्स कायम आहे. शार्दुल ठाकूर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची जागा घेतली आहे. भारताला सहाव्या गोलंदाजासाठी पर्याय शोधावा लागेल."आम्हाला खात्री करायची आहे की आम्हाला सहावा गोलंदाजीचा पर्याय मिळेल, फलंदाजी क्रमाने काही पर्याय देखील मिळतील." असेही रोहित शर्माने म्हटले आहे. 

 

भारतीय संघ-

 

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

 

संबंधित बातम्या- 

T20 World Cup 2021 : पाकिस्तानविरोधात कसा असेल भारतीय संघ? इरफान पठाणने निवडला संभावित संघ


Virender Sehwag Birthday : विरेंद्र सेहवागने कुटुंबियांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला 'कू'वर


T20 World Cup: टी -20 वर्ल्डकपमध्ये 'या' पाच फलंदाजांवर सर्वांच्या नजरा, दोन भारतीय बॅट्समनचा समावेश