एक्स्प्लोर

T20 विश्वचषकासाठी यूएई, ओमानचा पर्याय? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळं आयसीसीचा प्लान बी, सूत्रांची माहिती

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच भारतात टी20 विश्वचषकाचं आयोजन करणं तसं अवघड होणार आहे. त्यामुळे आयसीसीनं टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी प्लान बी तयार ठेवला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं यंदाच्या वर्षात खेळवण्यात येणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी बॅकअप प्लान आखण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीआयनं टी20 विश्वचषकाच्या काही सामन्यांच्या आयोजनाबाबत ओमान क्रिकेटसोबत चर्चा सुरु केली आहे. ओमान क्रिकेटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं यासदंर्भात माहिती दिली आहे. आयसीसीनं या आठवड्यात बीसीसीआयला टी20 विश्वचषक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यासंदर्भात माहिती देण्यास सांगितलं होतं. त्यासाठी बीसीसीआयला एक महिन्याचा कालावधीही आयसीसीच्या वतीनं देण्यात आला होता. टी20 विश्वचषकाच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना युएई, ओमानचा पर्याय आयसीसीसमोर ठेवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा कमी झाला असला तरी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच भारतात टी20 विश्वचषकाचं आयोजन करणं तसं अवघड होणार आहे. त्यामुळे आयसीसीनं टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी प्लान बी तयार ठेवला असून गरज भासल्यास यूएईला आयोजनासाठी तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत विश्वचषकातील काही सामन्यांच्या आयोजनासाठी इतर देशांशी चर्चा करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.  

दरम्यान, टी20 विश्वचषकाचं आयोजन जरी दुसऱ्या देशात झालं तरी आयोजनाचे सर्व अधिकार बीसीसीआयकडेच असणार आहेत. ओमान क्रिकेटचे सचिन मधून जेसरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आयसीसीनं आमच्याशी संपर्क साधला आहे आणि ओमान क्रिकेटचे अध्यक्ष पंकज खिमजी, बीसीसीआयसोबत चर्चा करत आहेत."

टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी बीसीसायची ओमान क्रिकेटशी चर्चा सुरु 

ओमान विश्वचषकाच्या आयोजनासाठी पूर्णपणे तयार आहे. जेसरानीनं पुढे बोलताना सांगितलं की, "बीसीसीआयसोबत चर्चा सुरु आहे. आयसीसीनं आमच्याकडे काही माहिती मागितली आहे. ती आम्ही त्यांना दिली आहे. तसेच आम्ही टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी पूर्णपणे तयार असल्याची माहिती आयसीसीला दिली आहे."

ओमान यंदाच्या वर्षी टी20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांपैकी एक आहे. या देशात क्रिकेट पूर्णपणे व्यवसाय म्हणून खेळलं जातं. याची देखरेख खिमजी रामदास करतात, जे भारयीस वंशाचे व्यावसायिक आहे. जेसरानी यांनी सांगितलं की, "बीसीसीआयला विश्वचषकाचं आयोजन करण्यासंदर्भात अंतिम निर्णय कळवण्यासाठी 28 जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. तोपर्यंत ओमान क्रिकेटला वाट पाहावी लागणार आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
29 धावांत 8 विकेट्स... पण तरी जिंकली ट्रॉफी! क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात करिश्माई फायनल सामना; जिथे गोलंदाजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं
Hardik Pandya IPL Trade 2027 : 10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
10 कोटींची कॅश अन् खेळाडूंची अदलाबदल? हार्दिक पांड्याच्या ट्रेडवर मुंबई इंडियन्सचा सर्वात मोठा धमाका, नेमकं चाललयं तरी काय?
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget