T20 World Cup 2026 Team India: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 साठी (T20 World Cup 2026) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी शुभमन गिलला वगळले. तर अनेक महिन्यांपासून संघाबाहेर राहिलेला इशान किशन पुन्हा टीम इंडियात स्थान देण्यात आले. आतापर्यंत भारताच्या टी-20 क्रिकेट संघाचा उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलला (Shubhman Gill) थेट संघातून काढल्याने बीसीसीआयने धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा रंगली होती. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. (T20 World Cup 2026 Team India Squad)

Continues below advertisement

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) शुभमन गिलला टी-20 विश्वचषकाच्या संघात सामील करुन घ्यायचे होते. मात्र बीसीसीआयच्या निवड समितीत नवनियुक्त असलेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग (RP Singh-Pragyan Ojha) यांनी शुभमन गिलला संघात सामील करुन घेण्यास विरोध दर्शवला. तसेच इशान किशनला समील करण्याचा प्रस्तावही प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांनी मांडला. यावर गंभीर चर्चा झाली आणि त्यानंतर बीसीसीआयकडून आगामी टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

काही दिवसांपूर्वीचं प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांची निवड समितीत जबाबदारी- (RP Singh-Pragyan Ojha)

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने पुरुष वरिष्ठ संघासाठी दोन नवीन निवडकर्त्यांची घोषणा केली होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग या दोन दिग्गजांना बीसीसीआयच्या निवड समितीत जबाबदारी देण्यात आली होती. 

Continues below advertisement

आरपी सिंगची क्रिकेट कारकीर्द (RP Singh Cricket Career)

माजी वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंग याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये अनेक वर्षे क्रिकेट खेळले आहे. त्याने टीम इंडियासाठी 14 कसोटी, 58 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये कसोटी 40, एकदिवसीय 69 आणि टी-20 मध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत. 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो भाग होता. याव्यतिरिक्त, त्याने 94 प्रथम श्रेणी सामने, 136 लिस्ट ए सामने आणि 132 टी-20 सामने खेळले. 39 वर्षीय आरपी सिंगने 2011 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. सध्या तो समालोचनात दिसतो आणि आता तो टीम इंडियाच्या निवडीत महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रज्ञान ओझाची क्रिकेट कारकीर्द (Pragyan Ojha Cricket Career)

प्रज्ञान ओझाने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. त्याने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2013 मध्ये त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. फिरकी गोलंदाज ओझाने भारतासाठी 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने कसोटी 113, एकदिवसीय 21 आणि टी-20 मध्ये 10 विकेट्स घेतल्या. ओझाने 108 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 424 विकेट्स घेतल्या. त्याने 103 लिस्ट ए सामन्यांमध्ये 123 आणि 143 टी-20 सामन्यांमध्ये 156 विकेट्स घेतल्या.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संपूर्ण संघ: (Team India Squad T20 World Cup 2026)

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा.

संबंधित बातमी:

Team India Squad T20 World Cup 2026: शुभमन गिलच नव्हे, जितेश शर्मालाही वगळलं, बीसीसीआयचे 5 धाडसी निर्णय, टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?