Team India Squad T20 World Cup 2026: शुभमन गिलच नव्हे, जितेश शर्मालाही वगळलं, बीसीसीआयचे 5 धाडसी निर्णय, टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार?

Team India Squad T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 साठी संघ टीम इंडियाचा संघ निवडताना बीसीसीआयने 5 धडाकेबाज निर्णय घेतले.

Continues below advertisement

T20 World Cup 2026

Continues below advertisement
1/8
Team India Squad T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेसाठी आज (20 डिसेंबर) टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली.
2/8
बीसीसीआयने पत्रकार परिषद घेऊन सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. टी-20 विश्वचषक 2026 साठी संघ टीम इंडियाचा संघ निवडताना बीसीसीआयने 5 धडाकेबाज निर्णय घेतले.
3/8
1. शुभमन गिलला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे.
4/8
2. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
5/8
3. संजू सॅमसन आणि इशान किशन यांची विश्वचषक संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. संजूचा समावेश अपेक्षित होता, परंतु इशान किशनचा समावेश आश्चर्यकारक होता.
Continues below advertisement
6/8
इशान किशनने नोव्हेंबर 2023 मध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला होता. परंतु त्याने नुकत्याच संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत शतक ठोकणारा इशान हा पहिला कर्णधारही ठरला.
7/8
4. गेल्या अनेक महिन्यांपासून टी-20 संघातून बाहेर असलेल्या रिंकू सिंगला टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले.
8/8
5. जितेश शर्माला टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले आहे.
Sponsored Links by Taboola