नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं महिला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या पगारात वाढ केली आहे. आता महिला क्रिकेटपटूंना देखील पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणं पगार मिळेल.देशांतर्गत क्रिकेटमधील महिला मॅच ऑफिशिअल्स म्हणजेच पंच आणि सामनाधिकाऱ्यांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार बीसीसीआयनं टीम इंडियाच्या लेकींनी वनडे वर्ल्ड कप  2025 चं विजेतेपद मिळवल्यानंतर मानधनवाढीचा निर्णय घेतला. भारतानं वनडे वर्ल्ड कपच्या  फायनलमध्ये  दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केलं.  

Continues below advertisement

बीसीसीआयनं महिला क्रिकेटपटूंच्या वेतनात अडीचपट वाढ केली आहे. प्लेईंग इलेव्हनमधील सिनिअर महिला खेळाडूंना 50 हजार रुपये प्रतिमॅच मिळणार आहेत. हे मानधन पूर्वी 20 हजार रुपये होते.  बीसीसीआयनं राखीव महिला खेळाडूंचं मानधन देखील वाढवलं आहे. ज्या खेळाडून प्लेईंग इल्हेव्हनमध्ये नसतील त्यांना 25 हजार रुपये प्रति मॅच मिळतात. पहिल्यांदा बेंचवर बसणाऱ्या खेळाडूंना 10 हजार रुपये मिळायचे. बीसीसीआयनं प्रत्येक खेळाडूंना आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला आहे.  

ज्युनिअर क्रिकेट स्पर्धांमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना एक दिवस खेळण्यासाठी  25 हजार रुपये मिळतील. बाहेर बसणाऱ्या खेळाडूंना  12500 रुपये मिळतील. ज्युनिअर टी 20 मॅचेसमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना 12500 रुपये मिळतील आणि राखीव खेळाडूंना 6250 रुपये मानधन मिळेल. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार 22 डिसेंबरला बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार पंच आणि सामनाधिकाऱ्यांचं मानधन देखील वाढवण्यात आलं आहे.  

Continues below advertisement

दरम्यान, भारत आणि श्रीलंका महिला संघात टी 20 मालिका सुरु आहे.  दोन्ही संघांमध्ये या मालिकेत पाच सामने खेळवले जातील. पहिल्या टी 20 सामन्यात भारतानं श्रीलंकेला  8 विकेटनं पराभूत केलं. पहिल्या मॅचमध्ये जेमिमा रॉड्रिग्जनं अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.