नवी दिल्ली : पाकिस्तानचा (Pakistan) संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समाधानकारक कामगिरी करु शकलेला नाही. पहिल्यांदा भारतात झालेला वनडे वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमधून (T20 World Cup 2024) पाकिस्तान बाहेर पडला आहे. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीबद्दल पीसीबी मोठी कारवाई करु शकते. पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमधून ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) क्रिकेटपटूंच्या कराराचं समीक्षण केलं जाऊ शकतं. काही क्रिकेटपटूंच्या पगाराची रक्कम कमी केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर बाबर आझम कडून कप्तान पद काढून घेत शाहीन शाह आफ्रिदीकडं दिले होतं. टी 20 वर्ल्ड कप पूर्वी ते पुन्हा बाबर आझमकडे देण्यात आलं. बाबर आझमच्या नेतृत्त्वात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तानला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कॅनडाला पाकिस्ताननं पराभूत केलं. मात्र, सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅचचा निकाल पाकसाठी महत्त्वाचा ठरणार होता. पावसानं ती मॅच रद्द झाली आणि पाकिस्तानच्या सुपर 8च्या आशा संपुष्टात आल्या. 


पीसीबी खेळाडूंचा पगार कापणार?


पीसीबी आता टीमच्या खराब कामगिरीमुळं कठोर पाऊलं टाकणार असल्याची माहिती आहे. पीसीबी खेळाडूंच्या पगारात कपात करण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या विश्वसनीय सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार काही अधिकारी आणि माजी खेळाडूंनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांना केंद्रीय कराराचं समीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. 


शाहीन शाह आफ्रिदी कप्तानपद गेल्यानं आणि बाबरकडून पाठिंबा मिळत नसल्यानं नाराज होता. मोहम्मद रिजवान कॅप्टनपद मिळत नसल्यानं नाराज आहे. सूत्रांनुसार पाकिस्तानच्या संघात  तीन गट आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचे तीन गट असल्याच्या चर्चा आहेत. मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम सारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनानं टीमची स्थिती खराब झाल्याच्या चर्चा आहेत. 


बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान पीसीबीच्या केंद्रीय करारात अ गटात आहेत. त्यांना दरमहा 13.53 लाख रुपये मिळतात. ब गटात शादाब खान, फखर जमान,हॅरिस राऊफ, नसीम शाह  आहेत. त्यांना दरमहा 9 लाख मिळतात. गट क आणि गट ड मधील खेळाडूंना साडे चार ते अडीच लाख रुपये मिळतात. इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, हसन अली, सॅम अयूब ड गटात आहेत. याशिवाय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी विशिष्ट रक्कम दिली जाते.


संबंधित बातम्या :



Rishabh Pant : यूट्यूबमधून मिळणाऱ्या कमाईचं काय करणार, रिषभ पंतचा प्रेरणादायी निर्णय, म्हणाला वचन देतो...