न्यूयॉर्क : टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतनं टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियानं (Indian Cricket Team) टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत रिषभ पंतनं दमदार कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये रिषभ पंतनं दमदार फलंदाजी केली होती. अपघातानंतर जवळपास दीड वर्षानंतर रिषभ पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. रिषभ पंतनं एक यूट्यूब चॅनेल देखील सुरु केलं असून तो त्याच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधतो. नुकतंच त्याच्या यूट्यूब चॅनेलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं रिषभ पंतनं एक पोस्ट केली आहे. रिषभ पंतनं यूट्यूबमधून मिळणारी कमाई आणि त्याच्या कमाईतील काही रक्कम चांगल्या कामासाठी दान करणार असल्याचं म्हटलं.  



रिषभ पंतनं 18 मे 2024  रोजी नवं यूट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. आतापर्यंत रिषभ पंतनं 7 व्हिडीओ अपलोड केले आहेत. रिषभ पंतच्या चॅनेलचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. या निमित्तानं यूट्यूबकडून त्याला सिल्वर बटन पाठवण्यात आलं आहे. रिषभनं यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये सिल्वर बटनच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. रिषभनं त्यात म्हटलं की यूट्यूबमधून होणारी सर्व कमाई आणि त्यासह त्याची काही कमाई चांगल्या कामासाठी दान करणार आहे. म्हणजेच रिषभ पंत यूट्यूबवरुन जी कमाई करेल ती चांगल्या कामासाठी दान करणार आहे.  


रिषभ पंत नं कम्यूनिटी पोस्टमध्ये लिहिलं की सिल्वर प्ले बटन सर्वांचं आहे, एक लाख सबस्क्रायबर झाले आहेत आणखी लोक जोडले जात आहेत, हा टप्पा गाठल्यानंतर यूट्यूबची सर्व कमाई आणि स्वत:च्या कमाईतील काही रक्कम चांगल्या कामासाठी दान करण्याचं वचन देतो, असं रिषभ पंत म्हणाला. या प्लॅटफॉर्मला चांगल्या कामासाठी आणि बदल घडवण्यासाठी वापरुयात असं रिषभ पंतनं म्हटलं.  


रिषभ पंतची दमदार कामगिरी 


रिषभ पंतनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. रिषभ पंत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध रिषभला सूर गवसला होता. बांगलादेश विरुद्ध त्यानं 53 धावा केल्या होत्या. आयरलँड विरुद्ध रिषभ पंतनं 36 धावा केल्या होत्या. पाकिस्तान विरुद्ध रिषभनं 42 धावा केल्या होत्या. अमेरिकेविरुद्ध रिषभ पंतनं 18 धावा केल्या होत्या.  


संबंधित बातम्या : 



T20 World Cup 2024 : सौरभ नेत्रावळकरला मायभूमीत खेळण्याची संधी, अमेरिकेची टीम भारतात येणार, जाणून घ्या