न्यूयॉर्क :भारतानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं (Team India) तीन मॅच जिंकल्या आहेत. भारत विरुद्ध कॅनडा ही मॅच आज होणार आहे. भारतानं यावेळी सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना संधी दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियामध्ये 15 सदस्यांच्या संघात शुभमन गिलला (Shubman Gill ) संधी मिळाली नव्हती. शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. आता शुभमन गिलला भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनानं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 


मीडिया रिपोर्टस नुसार शुभमन गिल टीम इंडियासोबत वेळ घालवण्याऐवजी वैयक्तिक कामांमध्ये न्यूयॉर्कमध्ये सक्रीय होता. या कारणामुळं टीम मॅनेजमेंट शुभमन गिलवर नाराज झालं आहे. त्यामुळं शुभमन गिलला भारतात माघारी जाण्याबाबत सांगण्यात आलं आहे. भारतानं 15 सदस्यांच्या संघाशिवाय शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमदला राखीव खेळाडू म्हणून संधी दिली होती. न्यूयॉर्कमधील मॅचेस संपल्यानंतर शुभमन गिल आणि आवेश खानला भारतात परत जाण्यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. आता रिंकू सिंग आणि खलील अहमद हे दोघे राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असतील. 


शुभमन गिल अमेरिकेत पोहोचल्यानंतर संघासोबत प्रवास करत नव्हता. क्रिकेट संदर्भातील जबाबदारी पार पाडण्याऐवजी शुभमन गिल वैयक्तिक कामांना प्राधान्य देत होता. भारत पाकिस्तान मॅच दरम्यान खलील अहमद, आवेश खान आणि रिंकू सिंग हे तिघे संघाला पाठिंबा देताना दिसून आले होते. त्यावेळी शुभमन गिल अनुपस्थित होता. 


शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केलं...


शुभमन गिल आणि टीम मॅनेजमेंट यांच्यातील वाद वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टस नुसार शुभमन गिलनं टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये तणावाचं वातावरण असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 


टीम इंडिया आणि कॅनडा यांच्यात आज मॅच होणार आहे. फ्लोरिडात भारत आणि कॅनडा आमने सामने येईल.  यानंतर भारताचे सुपर 8 मधील सामने सुरु होतील. सुपर 8 मध्ये भारत  अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. भारताविरुद्ध तिसरा संघ कोणता असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारताची अफगाणिस्तान विरुद्ध 20 जूनला, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 24 जूनला मॅच असेल. 22 जूनला भारताविरुद्ध बांगलादेश किंवा नेदरलँडचा संघ असू शकतो. 


संबंधित बातम्या :



T20 World Cup 2024 : सौरभ नेत्रावळकरला मायभूमीत खेळण्याची संधी, अमेरिकेची टीम भारतात येणार, जाणून घ्या