फ्लोरिडा : भारत आणि अमेरिकेविरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर पावसाचा फटका बसल्यानं पाकिस्तानचं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. पाकिस्ताननं अखेरच्या मॅचमध्ये आयरलँडला तीन विकेटनं पराभूत केलं. मात्र, पाकिस्तानच्या संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागला. आयरलँड पाकिस्तानला पराभूत करतं की काय अशी स्थिती एकवेळ निर्माण झाली होती. मात्र, पाकिस्ताननं कमबॅक केलं आणि विजय मिळवला. अखेर शाहीन शाह आफ्रिदीनं दोन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासाठी पाकिस्ताननं संघर्ष केला. आयरलँडनं पाकिस्तानला कडवी लढत दिली.
आयरलँडच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी कताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 106 धावा केल्या होत्या. आयरलँडला पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला धक्के दिले. आयरलँडच्या पहिल्या पाच विकेट 28 धावांवर पडल्या होत्या. डॉकरेल, अडायर, लिटल यांच्या खेळीच्या जोरावर आयरलँडनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 106 धावांपर्यंत मजल मारली. शाहीन शाह आफ्रिदीनं तीन विकेट घेत आयरलँडला धक्के दिले.
पाकिस्तानचा विजयासाठी संघर्ष
पाकिस्तानच्या संघानं आयरलँडला 106 धावांवर रोखल्यानंतर ते सहज विजय मिळवतील, अशी आशा पाक क्रिकेट चाहत्यांना होती. पाकिस्तान एकतर्फी वर्चस्व राखत आयरलँडला पराभूत करेल अशी आशा असताना. पाकिस्तानची टॉप ऑर्डर आज अयशस्वी ठरली. चांगली सुरुवात झाल्यानं पाकिस्ताननं 62 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. 39 ते 62 धावांच्या दरम्यान पाकिस्ताननं पाच विकेट गमावल्या. आयरलँडच्या गोलंदाजांनी धावसंख्या कमी असली तरी पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं होतं.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान, एस. अयुब या दोघंनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. तर, बाबर आझमनं 32 धावा केल्या. तर, फकर झमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हे खेळाडू फेल ठेरले. अब्बास अफ्रिदीच्या 17 धावा आणि शाहीन शाह आफ्रिदी याच्या 13 धावांच्या जोरावर पाकिस्ताननं विजय मिळवला.
पाकिस्तानचं आव्हान संपलं
पाकिस्तानची यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधील सुरुवात पराभवानं झाली. अमेरिकेनं पाकिस्तानला पराभूत केलं. त्यानंतर भारतानं देखील पाकिस्तानच्या हातातून मॅच हिसकावून घेतली. यानंतर पाकिस्ताननं पुढच्या मॅच मध्ये कॅनडाला पराभूत केलं. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅचमध्ये अमेरिका पराभूत झाली असती पाकिस्तानला सुपर 8 चं तिकीट मिळालं असतं. मात्र, पावसानं मॅच रद्द झाली आणि अमेरिकेचा टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवेश मात्र निश्चित झाला होता.
संबंधित बातम्या :
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...