T20 World Cup 2024 : सुपर 8 मध्ये आतापर्यत सात संघांचा प्रवेश, आठवा संघ भारताविरुद्ध लढणार, कुणाची वर्णी लागणार?
ऑस्ट्रेलियानं ब गटातून सर्व प्रथम सुपर 8 मध्ये प्रवेश केल आहे. ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 24 जूनला लढणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत केल्यानं इंग्लंडला सुपर 8 ची दारं उघडली आहेत. सुपर 8 मध्ये इंग्लंड दुसऱ्या गटात आहे.
टी 20 वर्ल्ड कपचे आयोजक असलेल्या दोन्ही संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजनं क गटातून प्रवेश केला आहे. सुपर 8 मध्ये यांची लढत भारतासोबत होणार नाही.
अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये केलेला प्रवेश सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. भारत आणि अफगाणिस्तान 20 जूनला मॅच होणार आहे.
अमेरिकेनं यंदा पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना सुपर 8 ची दारं उघडली आहेत. अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील मॅच पावसानं रद्द झाल्याचा फटका पाकिस्तानला बसला.
दक्षिण आफ्रिकेनं गट ड मधून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि अमेरिका यांच्याविरोधात सामने खेळेल.
भारतानं अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताविरुद्ध अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचं आव्हान असेल. रोहित शर्माचा संघ यावेळी इतिहास घडवतो का हे पाहावं लागेल.
गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं प्रवेश केला आहे. मात्र, या गटातून दुसरा संघ अद्याप सुपर 8 मध्ये पोहोचलेला नाही. बांगलादेशला सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी आहे. बांगलादेश विरुद्ध नेपाळ लढतीच्या निकालावर पुढचं समीकरणव अवलंबून असेल.
नेदरलँडस आणि बांगलादेश यांच्यात सुपर 8 मध्ये प्रवेशासाठी चढाओढ सुरु आहे. नेदरलँडस् आणि श्रीलंका यांच्या मॅचकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.