T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकाचा महसंग्राम अवघ्या काही तासांतच सुरु होणार आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महाकुंभाची जगभरात चाहूल लागली आहे. प्रत्येकजण टी20 विश्वचषकाची वाट पाहतोय. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह 20 संघ एका चषकासाठी भिडणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. या विश्वचषकात अनेक रेकॉर्ड्स मोडले जातील, नवे रेकॉर्ड्स होतील. आतापर्यंत आठ विश्वचषक झाले आहेत, त्यामध्ये सर्वाधिक षटकार कुणाच्या नावावर आहेत? सर्वाधिक विकेट कुणी घेतल्या, कोणता विकेटकीपर सर्वात यशस्वी ठरला, याबाबत आज जाणून घेणार आहेत... 


टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 फलंदाज कोणते ?


1 . ख्रिस गेल (63) : ‘यूनिवर्स बॉस’ यानं क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये विस्फोटक फलंदाजी केली आहे. टी20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाज ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल यानं टी20 विश्वछषकात तब्बल 63 षटकार ठोकण्याचा भीमपराक्रम केलाय. ख्रिस गेल याने विश्वचषकात एकाच सामन्यात 11 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय. मुंबईमध्ये इंग्लंडविरोधात गेल यानं 11 षटकार ठोकले होते. 


 2 . रोहित शर्मा (35 ) : भारताचा कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 36 डावात 35 षटकार ठोकले आहेत. यंदाच्या विश्वचषकात हिटमॅनकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा असेल. 


3 : जोस बटलर (33) : इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानं 27 सामन्यात 33 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माला मागे टाकण्यासाठी बटलरा फक्त दोन षटकाराची गरज आहे.  


4 . युवराज सिंह ( 33) : भारताचा सिक्सर किंग युवराज सिंह टी20 विश्चषकात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजात चौथ्या क्रिमांकावर आहे. युवराजने टी20 विश्वचषकात 33 षटकार ठोकले आहेत. 2007 टी20 विश्वचषकात त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकचा षटकात सहा षटकार ठोकले आहेत.  


 5 . शेन वाटसन (31) : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन यानं टी20 विश्वचषकात 31 षटकार ठोकले आहेत, तो पाचव्या क्रमांकावर आहे.


टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते ? : 


1 . शाकीब अल हसन ( 47 विकेट ) : बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन याचा हा नववा विश्वचषक आहे. त्याने विश्वचषकातील 35 डावात 47 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. शाकीब अल हसन आणि रोहित शर्मा हे दोनच खेळाडू असे आहेत, की ते 2007 च्या टी20 विश्वचषकात खेळत होते, ते या विश्वचषकातही खेळत आहेत. 


2 . शाहिद आफ्रिदी ( 39 विकेट ) : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने 34 सामन्यात 39 विकेट घेतल्या आहेत. 


3 . लसिथ मलिंगा (38 विकेट ): श्रीलंकाचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाने 31 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत.  


 4 . सईद अजमल ( 36 विकेट ) : पाकिस्तानचा फिरकी गोलंजाज सईद अजमल याने 23 सामन्यात 36 विकेट घेतल्या आहेत.  


5. अजंता मेंडिस ( 35 विकेट ) : श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज अजंता मेंडिस यानं 21 सामन्यात 35 विकेट घेतल्या आहेत. 


टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. त्याशिवाय टॉप 5 मधील चार गोलंदाज निवृत्त झाले आहेत.


टी20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी विकेटकीपर : 


1 . महेंद्र सिंह धोनी (32 विकेट )    


2 . कामरान अकमल (30 विकेट) 


3 . दिनेश रामदीन (27 विकेट) 


4 . कुमार संगकारा (26 विकेट ) 


5 . क्विंटोन डिकॉक (22 विकेट)