T20 World Cup 2024 Ind vs SA Final: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. (India Win T20 World Cup 2024) या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे टॉप 10 फलंदाज आणि गोलंदाज कोण ठरले, पाहा यादी...


टी-20 विश्वचषकातील टॉप 10 फलंदाज 



  1. रहमानुल्लाह गुरबाझ
    सामने-8, धावा-281

  2. रोहित शर्मा
    सामने-8, धावा-257

  3. ट्रॅव्हिस हेड-
    सामने-7, धावा-255

  4. क्विंटन डिकॉक-
    सामने-9, धावा-243

  5. इब्राहिम जादरान-
    सामने-8, धावा-231

  6. निकोलस पूरन-
    सामने-7, धावा-228

  7. अॅन्ड्रीज गॉस-
    सामने-6, धावा- 219

  8. जॉस बटलर-
    सामने-8, धावा-214

  9. सूर्यकुमार यादव-
    सामने-8, धावा-199

  10. फिल सॉल्ट-
    सामने-8, धावा-188


टी-20 विश्वचषकातील टॉप 10 गोलंदाज



  1. अर्शदीप सिंग-
    सामने-8, विकेट्स-17

  2. फजलहक फारुकी-
    सामने-8, विकेट्स-17

  3. जसप्रीत बुमराह-
    सामने-8, विकेट्स-15

  4. राशिद खान-
    सामने-8, विकेट्स 14

  5. रिशाद हुसेन-
    सामने-7, विकेट्स 14

  6. नवीन उल हक-
    सामने-8, विकेट्स 13

  7. एन्रिक नॉर्खिया-
    सामने- 9, विकेट्स-15

  8. अल्झारी जोसेफ-
    सामने-7, विकेट्स-13

  9. अॅडम झम्पा-
    सामने-7, विकेट्स-13

  10. कगिसो रबाडा-
    सामने-9, विकेट्स- 13


विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब- 


टीम इंडियाचे सर्वात मोठे योगदान फलंदाजीचे होते. संपूर्ण विश्वचषकात अनुभवी विराट कोहलीची बॅट शांत राहिली. पण जिथे गरज होती तिथे विराट कोहलीने शानदार खेळी करत टीम इंडियाला अशा एकूण धावसंख्येवर नेलं की जिथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. विराट कोहलीच्या 76 धावांच्या शानदार खेळीमुळे विराट कोहलीला सामनावीराचा किताबही देण्यात आला.


जसप्रीत बुमराह ठरला 'Player Of The Tournament'


जसप्रीत बुमराह 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. या विश्वचषकात बुमराहने आठ सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या आणि अनेक वेळा भारताला हरवलेले सामने जिंकून दिले. अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेला 18 चेंडूत 22 धावांची गरज असताना बुमराहने 18व्या षटकात केवळ दोन धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. येथून भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: जिंकला, हसला, रडला, तिरंगा रोवला; विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंगावर काटा आणणारे टॉप 15 फोटो


T20 World Cup 2024 Team India Prize Money: विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?


T20 World Cup 2024 Team India Celebration: विश्वचषक घेताना रोहित शर्माची अनोखी एन्ट्री; सोशल मीडियावर ट्रेंड, पाहा संपूर्ण Video