T20 World Cup 2024 Ind vs Pak Rohit Sharma On Virat Kohli: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) आज भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे, जो स्पर्धेतील 18 वा सामना असेल. या सामन्यात भारतीय चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कोहलीने मागील 2022 टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. आता भारत-पाकिस्तानच्या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) विराट कोहलीवर (Virat Kohli) कौतुकांचा वर्षाव केला आहे.
रोहित शर्मा काय म्हणाला? (Rohit Sharma On Virat Kohli)
विराट कोहली बांगलादेशविरुद्ध (सराव सामना) खेळला नाही, पण त्याने पुरेसा सराव केला आहे. त्याने काल सराव केला. आयर्लंविरुद्धचा पहिला सामना चांगला नव्हता. विराट कोहलीला मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे, त्याला कोणीही हरवू शकत नाही. त्याच्याप्रमाणेच प्रत्येकावर जबाबदारी असते, असं रोहित शर्माने सांगितले. दरम्यान आयर्लंडविरुद्ध विराट कोहलीने 5 चेंडूत फक्त 1 धाव केली होती.
विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड-
टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये विराट कोहली काही खास करू शकला नाही. सलामीला कोहली रोहित शर्मासोबत मैदानावर दिसला. मात्र, वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात कोहलीने आपली विकेट गमावली. कोहलीने 5 चेंडूत केवळ 01 धावा केल्या होत्या. पण, विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या T20 विश्वचषकात, त्याने 53 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82* धावांची खेळी केली आणि भारताला गमावलेला सामना जिंकण्यास मदत केली.
कोहलीचा आतंरराष्ट्रीय रेकॉर्ड-
कोहलीच्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकूण रेकॉर्डबद्दल सांगायचे तर, त्याने 10 सामने खेळले आणि 10 डावात 81.33 च्या सरासरीने आणि 123.85 च्या स्ट्राइक रेटने 488 धावा केल्या. या कालावधीत, त्याने आपल्या बॅटने 5 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या 82* धावा आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत 48 चौकार आणि 11 षटकार मारले आहेत.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.