T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) 19 वा सामना  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. 


भारत आणि पाकिस्तान आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. गेल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर बाबर आझमच्या संघाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, आता ते पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. बाबर तसेच मोहम्मद रिझवानकडून पाकिस्तानला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मात्र याचदरम्यान पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचं विधान चर्चेत आहे. 


भारताविरुद्धच्या सामन्याआधी गॅरी कर्स्टन काय म्हणाले?


मी आयपीएलमधील गुजरात टायटन्सच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले. बऱ्यापैकी भारतीय खेळाडूंसोबत माझा चांगला अनुभव आहे. आता टी-20 विश्वचषकाची स्पर्धा सुरू झाली आहे. पाकिस्तानी संघाला प्रेरणा देण्याची गरज मला भासत नाही. पण सामना न जिंकणे कधीच चांगले नसते. मात्र पाकिस्तानी खेळाडूंना वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे. दोन दिवसांपूर्वी जे काही झाले ते आम्ही विसरलो आहोत. आम्ही त्यातून बाहेर पडलो आहोत. 


आज कोणाला मिळणार संधी?


पाकिस्तानला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करायला लागला होता. तर भारताने आयर्लंडविरुद्ध विजयी सुरुवात केली आहे. भारताविरुद्धचा सामन्यात विजय मिळवणं पाकिस्तानसाठी महत्वाचं असणार आहे. भारताकडून आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने सलामीवीरची भूमिका बजावली होती. त्यामुळे आज पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येणार की यशस्वी जैस्वाल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तसेच आयर्लंविरुद्ध संजू सॅमसनला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आज अक्षर पटेलच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.


पाकिस्तान संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इमाद वसीम, इफ्तिखार अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद अमीर, हरिस रौफ आणि नसीम शाह.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Ind vs Pak: शाहीन अफ्रिदीने जसप्रीत बुमराहच्या मुलाला दिलं होतं गिफ्ट; संजना म्हणाली, अंगद ते आजही वापरतोय...


T20 World Cup Ind vs Pak: महामुकाबला! टी-20 विश्वचषकात आज भारत अन् पाकिस्तान यांच्यात लढत; सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर