T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) सुपर-8 च्या फेरीत काल भारत आणि ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) सामना झाला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताची दुसऱ्या उपांत्य फेरीत 27 जूनला इंग्लंडसोबत लढत असेल. 


भारताच्या विजयात रोहित शर्मा, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी सर्वात मोठे योगदान दिले. रोहितने 41 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी खेळली, तर कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये येऊन 2 महत्त्वाचे बळी घेतले. तर अर्शदीप सिंगने देखील भेदक मारा करत 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलला प्रत्येकी 1 विकेट घेतली. 


रोहितने स्टार्कला धू धू धुतले-


कर्णधार रोहित शर्माने भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना पराभूत केले आणि अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 41 चेंडूत 92 धावांची शानदार खेळी खेळली आणि भारताची धावसंख्या 205 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेष म्हणजे रोहितने मिचेल स्टार्कला धू धू धुतले. स्टार्कच्या एका षटकात रोहितने 29 धावा केल्या.






पत्नी रितिकाची रिअॅक्शन व्हायरल-


मिचेल स्टार्कचे षटक संपताच कॅमेऱ्याचे लक्ष रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहकडे गेले. रोहितची ही तुफानी स्टाईल पाहून रितिकाला खूप आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटलं. 'हिटमॅन'ने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले तेव्हा रितिकाने टाळ्या वाजवल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय खेळाडूने केलेले हे तिसरे जलद अर्धशतक आहे. रोहितपूर्वी केएल राहुल (18 चेंडू) आणि युवराज सिंग (12 चेंडू) यांनी अर्धशतके झळकावली होती.






भारताने 206 धावांचे लक्ष्य दिले होते


नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजीला आला. विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला असला तरी रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी खेळून दाखवला. त्याने आपल्या डावात 7 चौकार आणि 8 षटकार मारले आणि यादरम्यान त्याने मिचेल स्टार्कच्या याच षटकात 4 षटकारही मारले. सूर्यकुमार यादवनेही तुफानी खेळी करत 16 चेंडूत 31 धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी मिळून टीम इंडियाची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. हार्दिकने 17 चेंडूत 27 तर दुबेने 22 चेंडूत 28 धावा केल्या.


संबंधित बातमी:


T20 World Cup 2024: जसप्रीत बुमराह ते शेन वॉटसनपर्यंत...; 4 दिग्गज क्रिकेटपटूंनी स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत केलं लग्न