Tanzim Hasan Sakib and Rohit Paudel Fight न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात 37 वी मॅच झाली होती. ही मॅच 17 जूनला झाली होती. या मॅचमध्ये बांगलादेशनं 21 धावांनी विजय मिळवला होता. मात्र, या मॅचमध्ये एक वादग्रस्त प्रकार घ़ला होता. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझिम हसन साकिब आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पॉडेल या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाप्रकरणी आयसीसीनं तंझिम हसन साकिब (Tanzim Hasan Sakib) विरोधात कारवाई केली आहे.
साकिबला आयसीसीकडून दंड
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंझिम हसन साकिब आणि रोहित पॉडेल यांच्यातील वादाची आयसीसीनं गंभीर दखल घेतली आहे. आयसीसीनं आचारसंहिता कलम 2.12 च्या उल्लंघन प्रकरणी तंझिम हसन साकिबला दोषी मानत कारवाई केली आहे. आयसीसीनं तंझिम साकिबला मॅच फीच्या 15 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली आहे.
तंझिम साकिबला दंड का झाला?
टी 20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील 37 व्या मॅचमध्ये नेपाळ आणि बांगलादेश आमने सामने होते. तंझिम साकिब नेपाळविरुद्ध तिसरी ओव्हर टाकत होता. त्यावेळी तंझिम साकिबनं एक आक्रमक बॉल टाकल्यानंतर नेपाळचा कॅप्टन रोहित पॉडेलपर्यंत जाऊन त्याला स्पर्श केला होता. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी झाली होती. यानंतर पंच सॅम नोगाज्स्की यांनी हस्तक्षेप केला होता.
काय आहे आयसीसीचं आर्टिकल 2.12?
तंझिम साकिबाला खेळाडू आणि इतर सहयोगी स्टाफसंदर्भात असलेल्या आयसीसी आचारसंहिता कलम 2.12 चं उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी मानलं गेलं आहे. "खेळाडू, खेळाडूंशी संबंधित कर्मचारी, पंच आणि मॅच रेफरी किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यातील प्रेक्षकांशी शारीरिक संपर्क केल्यास ते उल्लंघन मानलं जातं. तंझिम साकिब यांची ही पहिली चूक होती. आयसीसीनं आर्थिक दंड केला असून साकिबला निगेटिव्ह डिमेरिट पॉईंट मिळाला आहे.
दरम्यान, दोन वर्षात एखाद्या खेळाडूला चार किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉईंट मिळाल्यास खेळाडूवर बंदी घातली जाते.मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी दिलेल्या शिक्षेचा तंझिम साकिबनं स्वीकार केला आहे.
बांगलादेशनं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेश सुपर 8 मध्ये भारत, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढणार आहे. बागंलादेशनं नेपाळला पराभूत करत सुपर8 मध्ये प्रवेश केला आहे.
संबंधित बातम्या :
T20 World Cup 2024 : सुपर 8 साठी अफगाणिस्तान तयार, राशिद खानचा टीम इंडियाला इशारा, म्हणाला....