T20 World Cup 2022 : युएईमध्ये झालेल्या विश्वचषकाचा (T20 World cup 2021) माहौल अद्याप शांत झाला नसतानाच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचं (2022 T20 World Cup) बिगुल वाजलं आहे. चॅम्पियन ऑस्ट्रेलिया घरच्या प्रेक्षकांसमोर खिताब वाचवण्यासाठी उतरणार आहे. कारण, आयसीसीनं 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या ठिकाणाची घोषणा केली आहे. शिवाय, फायनल आणि सेमीफायनलच्या तारखांची घोषणा केली आहे. 16 ऑक्टोबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे, तर 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) फायनल सामना होणार आहे. 


2022 विश्वचषकात वेगवेगळ्या सात ठिकाणावर (T20 World Cup 2022 Venues) एकूण 45 सामने होणार आहेत. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर रोजी तर अ‍ॅडिलेड क्रिकेट ग्राऊंडवर दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 
 
जानेवारीमध्ये येणार पूर्ण शड्युल -
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं पूर्ण वेळापत्रक जानेवारीमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच तिकिटांची विक्रीही जानेवारीमध्येच सुरु होणार आहे. 2020 मध्येच ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक होणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे हा विश्वचषक 2022 मध्ये होत आहे. 


8 संघाचा सुपर-12 मध्ये थेट प्रवेश  
यंदाच्या विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता न्यूझीलंड या संघांना थेट सुपर-12 मध्ये प्रवेश देण्यात आलाय. त्याशिवाय टी-20 क्रमवारीत अव्वल असणाऱ्या इतर सहा संघानाही थेट प्रवेश मिळालाय. यामध्ये इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, अफगानिस्तान आणि बांगलादेश संघांचा समावेश असेल. श्रीलंका (2021 चॅम्पियन), वेस्ट विडिंज (2012,2016 चॅम्पियन) या संघाना पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.  





2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकाबद्दल –
स्पर्धेचं आयोजन कधीपासून कधीपर्यंत : 16 ऑक्टोबर पासून 13 नोव्हेंबरपर्यंत
स्पर्धेची ठिकाणं : अॅडलेड,ब्रिसबेन, होबार्ट, मेलबर्न, पर्थ, सिडनी आणि गीलोंग
सुपर-12 मध्ये थेट प्रवेश मिळालेले संघ : ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, अफगानिस्तान आणि बांग्लादेश
पात्रता फेरी खेळणारे संघ : श्रीलंका, वेस्टइंडीज, स्कॉटलंड, नामिबिया, चार संघ पात्रता फेरीतून