India vs Pakistan Match Tickets: आगामी टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 23 ऑक्टोबरला खेळला जाणार. या सामन्यासाठी दोन्ही देशांसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळत आहे. टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारत आणि पाकिस्तान त्यांच्या पहिल्या सुपर 12 सामन्यात आमने-सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटाला सुरुवात होताच काही मिनिटांतच सर्व तिकिटं विकली गेली आहेत. आयसीसीच्या (ICC) प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आलीय. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटं विकली गेल्याची माहितीही आयसीसीनं दिलीय. 


आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, " 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर रंगणाऱ्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारताच्या सामन्याची सर्व तिकिटं विकली गेली आहेत. एवढेच नव्हेतर, स्टँडिंग रूमची तिकिटेही काही मिनिटांतच विकली गेली. भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या नजदीक अधिकृतपणे रि-सेल प्लेटफॉर्म लॉन्च केलं जाईल, ज्यामुळं चाहते आपल्या तिकिटांना एक्सचेंज करू शकतात."


टी-20 विश्वचषकाचा थरार पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उस्तुकता
"भारत आणि अ गटातील  रनर-अप संघ यांच्यातील सुपर-12 फेरीच्या सामन्यांचीही सर्व तिकिटं विकली गेली आहेत. यासोबतच दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या सर्व तिकिटांची विक्री झालीय. मात्र, या सामन्यांसाठी आणखी काही तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. सुपर-12 फेरीच्या सुरुवातीच्या सामन्यांची (ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका)  जवळपास सर्व तिकिटं विकली गेली आहेत. या सामन्यांची फारच कमी तिकिटं शिल्लक आहेत", असंही आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.


टी-20 विश्वचषकाची आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री
ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळत आहे. "एक महिन्यानंतर सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी आतापर्यंत 5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झालीय. दरम्यान, 16 आंतरराष्ट्रीय संघातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी 82 देशांतील क्रिकेटप्रेमींनी तिकीटं विकत घेतली आहेत", अशीही माहिती आयसीसीनं दिलीय.


हे देखील वाचा-