MI Cap Town: मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये (CSA T20 League 2023) समाविष्ट असलेल्या एमआय केपटाऊन फ्रँचायझीच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आलीय. दक्षिण आफ्रिका टी-20 लीगच्या लिलावापूर्वी एमआय केपटाऊन संघाच्या मुख्यप्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची घोषणा करण्यात आलीय. 


ऑस्ट्रेलियाच्या माजी स्टार फलंदाजी सायमन कॅटिच यांच्यावर एम आय केपटाऊन संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. तर, दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज हाशिम अमला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्सचे सध्याचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून अतिरिक्त भूमिका सांभाळतील आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि गृह प्रशिक्षक रॉबिन पीटरसन संघाचे सरव्यवस्थापक असतील.


आकाश अंबानी काय म्हणाले?
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, “एमआय केपटाऊन कोचिंग टीममध्ये सायमन आणि हाशिमचे स्वागत करताना मला आनंद होतोय. जेम्स आणि रॉबिनसोबत आम्ही दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटचा एमआय ब्रँड असणारा संघ होणार आहोत. आयपीएलप्रमाणे जगभरातील टी-20 लीगमध्ये एमआयचा संघ छाप सोडण्याचा प्रयत्न करेल."


ट्वीट-


ट्वीट-


ट्वीट-


ट्वीट-


महिला जयवर्धनेकडं मोठी जबाबदारी
महिला जयवर्धने अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळत होते. परंतु,रिलायन्स इंडस्ट्रीजनं संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिकेतल्या टी-20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचा निर्णय घेतलाय. यूएईतल्या टी-20 लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची एमआय एमिरेट्स आणि दक्षिण आफ्रिकेतल्या लीगसाठी एमआय केपटाऊन हे संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्ससह एमआय इमिरेट्स एमआय केपटाउन या तिन्ही संघाच्या प्रदर्शनात सुधरणा करण्याची जबाबदारी जयवर्धने यांच्यावर सोपवण्यात आलीय. 


जहीर खान एमआयचे हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट
महिला जयवर्धने यांच्याव्यतिरिक्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्यावरही मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. जो खेळाडूंच्या विकासासाठी जबाबदार असेल. याशिवाय, खेळाडूंची प्रतिभा ओळखणं आणि एमआयसाठी एक मजबूत संघ तयार करणे, यासाठी जहीर खान काम करेल. झहीरची ही भूमिका जगभरातील एमआयच्या संघांना मदत करण्यात महत्त्वाची ठरेल.


हे देखील वाचा-