Asad Rauf Passes Away: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर आलीय. आयसीसीच्या (ICC) एलिट पॅनलचा भाग राहिलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ (Asad Rauf) यांचं बुधवारी (14 सप्टेंबर) लाहोरमध्ये निधन झालंय. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवलीय. असद रौफ यांच्या मृत्युच्या वृत्ताला त्याचा भाऊ ताहिर यांनी दुजोरा दिलाय. "मृत्यूपूर्वी असद रौफ हे त्यांचं चप्पलांचं दुकान बंद करून घरी जात असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळं त्यांचा मृत्यू झालाय, असं ताहिर यांनी सांगितलंय. रौफ यांच्या अचानक जाण्यानं क्रिकेटविश्व शोकसागरात बुडालंय. 


असद रौफ यांचं चप्पलांचं दुकान आहे. परंतु, बुधवारी दुकान बंद करून घरी जात असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. असद रौफ यांच्या निधनानं क्रिडाविश्वावर शोककळा पसरलीय. क्रिकेटचाहते सोशल मीडियाद्वारे रौफ यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. 


ट्वीट-



रौफ यांची कारकिर्द
रौफनं 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भुमिका बजावली होती. ज्यात 64 कसोटी, 28 टी-20 आणि 139 एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. त्यांनी 2013 मध्ये सर्व प्रकारच्या अंपायरिंगमधून निवृत्त घेतली होती.


क्रिकेटमधून पाच वर्षांची बंदी
रौफ हे 2006 ते 2013 या काळात आयसीसीच्या एलिट अंपायर पॅनेलचा सदस्य होते. 2013 साली बीसीसीआयने बसवलेल्या शोध समितीत मॅच फिक्सिंगच्या आरोपात रौफ दोषी सापडले होते. त्यांनी 2013 साली आयपीएल सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याचे समजले होते, ज्यानंतर 2016 साली बीसीसीआयद्वारे त्यांच्यावर 5 वर्षांची बंदी लावण्यात आली होती.


लाहोरमध्ये चप्पलांचं दुकान
मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकल्यानंतर रौफ यांच्यावर चपल्या विकायची वेळ आली.  लाहोरमध्ये त्यांचं चप्पल बुटांचं दुकान होतं. आपल्या स्टाफसाठी त्यांनी हे दुकान सुरु केल्याचं अनेकदा सांगितलंयरौफ हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.  रौफ यांचा एक मुलगा दिव्यांग आहे. तर, दुसरा मुलगा सध्या अमेरिकेत शिक्षण घेऊन परत मायदेशी परतलाय. रौफ यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत. 


हे देखील वाचा- 


WI T20 WC Sqaud : रसेल-नारायणचा पत्ता कट, टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट विंडिजच्या संघाची घोषणा


सौरव गांगुली आणि जय शाह जोडी 2025 पर्यंत बीसीसीआयमध्ये करणार राज, SC कडून मंजूरी