दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, आर अश्विन, हर्षल पटेल, 2022 T20 वर्ल्डकपमधील कुणाकुणाला यंदा डच्चू?
2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघात कोण कोण होतं? संघाची धुरा कुणाच्या हातात होती? भारतीय संघाची तेव्हा कामगिरी कशी राहिली? फायनलमध्ये कोण जिंकलं? याबाबतची माहिती थोडक्यात जाणून घेऊयात..
T20 World Cup 2022 India Squad : अवघ्या महिनाभरात टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. लवकरच टीम इंडियाची निवड होईल. पण 2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघात कोण कोण होतं? संघाची धुरा कुणाच्या हातात होती? भारतीय संघाची तेव्हा कामगिरी कशी राहिली? फायनलमध्ये कोण जिंकलं? याबाबतची माहिती थोडक्यात जाणून घेऊयात..
2022 चा विश्वचषक कुणी जिंकला ?
2022 चा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये रंगला होता. यजमान ऑस्ट्रेलियाचं आव्हान सुपर 12 फेरीत संपुष्टात आले. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये फायनलचा सामना रंगला होता. इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेटनं पराभव करत चषकावर नाव कोरलं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेटच्या मोबदल्यात 137 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल इंग्लडने पाच विकेटच्या मोबदल्यात 138 धावा केल्या.
टी20 विश्वचषकात भारताची स्थिती काय ?
रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाचं 2022 टी20 विश्वचषकातील आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले. इंग्लंडने भारताचा दहा विकेटने दारुण पराभव करत दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 168 धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडने हे आव्हान चार षटकं आणि दहा विकेट राखून पार केले. सुपर 12 मध्ये भारतीय संघानं दिमाखदार कामगिरी केली होती. भारताने पाच सामन्यातील चार विजय मिळवले होते. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. पण सेमीफायनलमध्ये भारताचे आव्हान इंग्लंडसमोर संपुष्टात आलं.
सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर ? -
2022 टी20 विश्वचषकात विराट कोहलीनं सर्वाधिक धावा केल्या होत्या. विराट कोहलीने सहा सामन्यात 296 धावांचा पाऊस पाडला होत्या. यामध्ये त्यानं चार अर्धशतकं ठोकली होती. सूर्यकुमार यादव यानं सहा सामन्यात 239 धावा चोपल्या होत्या. यामध्ये 3 अर्धशतकाचा समावेश होता. केएल राहुल यानं सहा सामन्यात 128 धावा केल्या होत्या.
कुणी किती विकेट घेतल्या ?
भारताकडून अर्शदीप यानं सर्वाधिक 10 विकेट घेतल्या होत्या. अर्शदीप यानं सहा सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या होता. पांड्यानं सहा सामन्यात आठ विकेट घेतल्या होत्या. अश्विन आणि मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी सहा सहा विकेट घेतल्या होत्या. भुवनेश्वर कुमारला चार, अक्षर पटेल 3 यांनी विकेट घेतल्या होत्या.
2022 टी20 विश्वचषकात भारताच्या ताफ्यात कोण कोण ?
चार वेगवान गोलंदाज, 3 अष्टपैलू, दोन फिरकी गोलंदाज, दोन विकेटकीपर आणि चार फलंदाज 2022 टी20 विश्वचषकावेळी टीम इंडियात होते.
India Team Players List for T20 World Cup 2022
खेळाडूचं नाव | त्यावेळचं वय | रोल काय? |
रोहित शर्मा Rohit Sharma (Captain) | 35 | Batsman |
केएल राहुल KL Rahul (vice-captain) | 30 | Batsman |
विराट कोहली Virat Kohli | 33 | Batsman |
सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav | 31 | Batsman |
दीपक हुड्डा Deepak Hooda | 27 | All Rounder |
ऋषभ पंत Rishabh Pant (wk) | 24 | Batsman / Wicket Keeper |
दिनेश कार्तिक Dinesh Karthik (wk) | 37 | Batsman / Wicket Keeper |
हार्दिक पांड्या Hardik Pandya | 28 | All Rounder |
आर. अश्विन R. Ashwin | 35 | Bowler |
युजवेंद्र चहल Yuzvendra Chahal | 32 | Bowler |
अक्षर पटेल Axar Patel | 28 | All Rounder |
मोहम्मद शामी Mohammed Shami | 31 | Bowler |
भुवनेश्वर कुमार Bhuvneshwar Kumar | 32 | Bowler |
हर्षल पटेल Harshal Patel | 31 | Bowler |
अर्शदीप सिंह Arshdeep Singh | 23 | Bowler |