Australia vs West Indies: ICC T20 विश्वचषक स्पर्धेत उद्या म्हणजेच शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने आज सांगितले की, या सामन्यात मिचेल स्टार्कचा महत्त्वाचा अस्त्र म्हणून वापर करणार आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या मागील सामन्यात बांगलादेशला आठ विकेट्सने पराभूत केल्यानंतर नेट रन रेटच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले होते आणि शनिवारी अबुधाबीमध्ये जिंकल्यास उपांत्य ऑस्ट्रेलिया फेरीत प्रवेश करेल.


फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने बांगलादेशला 73 धावांत गुंडाळले. या सामन्यात स्टार्कनेच लिटन दासला शून्यावर बाद केल्यानंतर बांगलादेशच्या विकेट सतत पडू लागल्या. नंतर त्याने कॅप्टन महमुदुल्लालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


फिंच म्हणाला, "त्याचा (स्टार्क) खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील रेकॉर्ड अविश्वसनीय आहे, पण विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये, तो एक असा खेळाडू आहे ज्याच्याकडे खूप प्रतिभा आहे. नवीन चेंडूने सुरुवात करण्याची आणि डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्याची क्षमता जगात विशेषतः इतर गोलंदाजांपेक्षा जास्त आहे."


तो पुढे म्हणाला, "मी वेस्ट इंडिजच्या सामन्यात स्टार्कचा स्ट्राईक वेपन म्हणून वापर करेन. आम्हाला असे वाटते की मधल्या षटकांमध्ये विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी अशा गोलंदाजाचा वापर करायला हवा. स्टार्क हा असा गोलंदाज आहे जो सामना कधीही फिरवू शकतो.


तुमच्या माहितीसाठी, वेस्ट इंडिजचा संघ 2021 च्या T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर या गटात इंग्लंडने याआधीच अव्वल चारमध्ये स्थान मिळवले आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियाला पात्र ठरायचे असेल तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.